Heart Attack Treatment 
लाईफस्टाईल

Heart Disease: लाल मांस आणि बटर नाहीतर 'हे' पदार्थ खाल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Lifestyle Changes: चुकीच्या आहारामुळे आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण घटते. त्यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Sakshi Sunil Jadhav

चुकीच्या आहारामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण कमी होते.

रक्तवाहिन्या कमकुवत होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.

रेड मीट, बटर, आणि रिफाइंड फूड्स हानिकारक ठरतात.

ताजे फळे, व्यायाम आणि योग्य आहाराने हृदय निरोगी राहते.

बदलत्या लाईफस्टाईलचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होत असतो. त्यातच अनेकांच्या आहारात नॉन-व्हेजचा समावेश होतो. अनेकांना माहित असेल की रेड मीट आणि बटर हे हदयाच्या आजाराचे कारण मानले जाते. मात्र आता केलेल्या संशोधनामध्ये तज्ज्ञांनी याचे मुळ कारण शोधून काढले आहे. जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

तज्ज्ञांच्या मते सध्याच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे धावपळीच्या जीवनामुळे तसेच बदलत्या आहारामुळे ही अनेक आजारांच्या समस्या जाणवतात. चुकीच्या आहारामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. नायट्रिक ऑक्साईडच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

नायट्रीक ऑक्साईडचे महत्व

तज्ज्ञांच्या मते, नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतात. तसेच धमन्यांमध्ये प्लॅक जमा होण्यापासून बचाव करतात. जेव्हा याचा स्तर कमी होतो तेव्हा हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोकचा धोका वाढत जातो.

नायट्रिक ऑक्साईडमुळे कोणते नुकसान होते?

रिफाइंड शुगर

हेल्थ रिपोर्ट्समध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड आणि डेजर्ट्समध्ये असणारी शुगर ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाणे वेगाने वाढते.

रिफाइंड स्टार्च

तुम्ही ज्या वस्तुंचा वापर रोजच्या जीवनात करता त्याचा परिणाम नायट्रिक ऑक्साईडवर होत असतो. जसे की, व्हाइट ब्रेड, क्रॅकर्स आणि पेस्ट्री अशा पदार्थांमुळे शरीरातली सारखरेची पातळी वाढते. कारण पुढे याचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि रक्तात मिसळतं.

इंडस्ट्रीअल सीड ऑईल्स

फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूड हे नाश्तासाठी खाल्ले जातात. त्यामध्ये कॉर्न, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलाचा समावेश असतो जो हदयासाठी हानिकारक असतो. त्यामध्ये असलेले ओमेगा ६ फॅटी अॅसिड्स दीर्घकाळात वाढतात. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की, वारंवार गरम केल्यावर केल्याने त्यात विषारी संयुगे तयार करतात. संशोधनात असं सांगतात की, सतत हे पदार्थ सेवन केल्याने हदयरोगाचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

Jalgaon News: वाळूमाफियांची मुजोरी! तलाठ्यावर प्राणघातक हल्ला,ट्रॅक्टरवरून खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी?

SCROLL FOR NEXT