आयुष्यातील दिवस सारखे नसतात. कधी वाईट तर कधी चांगले असे दिवस येत असतात. त्यात कामाचा ताण, कुटुंबाचा ताण,कोणाला करिअरचं टेन्शन या सगळ्या ताणामुळे आपण स्वत:ला विसरून जात असतो. आपल्या डोक्यात सतत वेगवेगळे विचार येत असतात. याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो.त्यामुळे आपण चिडचिड करतो.
कोणावरही रागवतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो. यामुळे लोक आपला तिरस्कार करतात.पण आता याची चिंता सोडा. आपल्याकडे या समस्येवर एक सगळ्यात भारी उपाय आहे. त्याने तुमच्या स्वभावात नक्कीच बदल होईल. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की, आपण उगाच चिडचीड करतोय, तेव्हा तुम्ही या थेरपीचा वापर करू शकता.
थेरपी म्हणजे नेमकं काय? आणि कोणती?
गंधर्व वेदामध्ये असे आहे की, माणसाला आजारांपासून लवकरात लवकर बरं करायचे असेल तर संगीताची मदत तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे.तुम्हाला गाणी किंवा विशिष्ट प्रकारचे संगीत तयार करता येत असेल तर तुम्ही 'अॅक्टिव्ह म्युझिक थेरपी' करावी.
यात तुम्ही घरच्या घरी किंवा कुठल्याही शांत ठिकाणी बसून गाणी ऐकू शकता किंवा तयार करू शकता. त्याचसोबत तुम्हाला त्या गाण्यांवर प्रतिसाद द्यायचा असतो. तुमचे मत व्यक्त करायचे असते. तुम्ही तुमच्या जवळच्या म्युझिक थेरपी सेंटरमध्ये जाऊन सुद्धा थेरपी घेवू शकता.
उपयोग काय?
दुसऱ्या थेरपीचं नाव म्हणजे 'रिसेप्टिव्ह म्युझिक थेरपी' यात तुम्हाला तयार गाणे निवडायचे असते. त्याचा कालावधी सुरुवातीला अर्धा तास असावा.पुढे याचा कालावधी तुम्ही वाढवू शकता. गाण्याचा तसेच प्रत्येक वाद्याचा आवाज,गाण्यातले चढ-उतार, भाव आपण लक्षपूर्वक ऐकायचे असतात. याचा परिणाम आपल्या बोलण्यात आणि वागण्यात आढळतो.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर म्युझिक आपल्याला बरे करते. डिप्रेशनच्या समस्येवर याचा नक्कीच फायदा होतो. या थेरपी करताना योग्य संगीताचा वापर करावा. त्यात बासरी वादन, राग भैरवी , अशक्तपणासाठी राग जयवंती ऐकणे, उत्साह वाढवण्यासाठी थोड्या तीव्र संगीताचा वापर तुम्ही करू शकता.
हे खरं आहे का?
गंधर्व वेदामध्ये असे आहे की, माणसाला आजारांपासून लवकरात लवकर बरं करायचे असेल तर संगीताची मदत तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. हिंदू धर्मातल्या प्रत्येक देवी-देवतांकडे वाद्य होती. त्या काळापासून प्रत्येकाला संगीत माहीत आहे. अकबराच्या दरबारातल्या कथांमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर, महान गायक तानसेन त्याच्या मधूर आवाजाने तो महालातल्या लोकांसोबत जंगलातल्या प्राण्यांवर आणि पक्षांवर सुद्धा त्याच्या संगीताची छाप पाडत असायचा.
पुर्वी पासूनच मनोरंजनासाठी लोक गाण्याचा वापर करायचे. त्यावेळेस संगीत लाईव्ह ऐकलं जायचं. आता आपल्याकडे अनेक सुविधा आहेत. त्याचा वापर आपण केला पाहिजे. याचं कारण म्हणजे संगीत हे आपल्याला आजारापासून मुक्त करते. हे वेद शास्त्रांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे.
Edited by : Sakshi Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.