प्रत्येकाला रोजच्या जीवनातून विसावा घेण्यासाठी बाहेर जाण्याची इच्छा असते. बाहेर फिरायला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. बाहेर फिरल्यामुळे आपला माईंड फ्रेश राहतो. याबरोबर नवीन ठिकाणांची माहिती देखील मिळते. यासाठी नागरिक वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. काही नागरिकांना तर महिन्यानुसार फिरायला आवडते.
जर तुम्ही सुद्धा हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. हिवाळ्यामध्ये वातावरणात बदल होत असतात. यामुळे आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते.याबरोबर आपण कधीकधी अचानक आजारी देखील पडतो. पण तुम्ही सुद्धा या महिन्यात बाहेर जाणार असतील तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, हे जाणून घेऊया.
हिवाळ्यात फॅमिली किंवा मित्र-परिवारासोबत जाताना पॅकिंगकडे विशेष लक्ष द्या. याबरोबर तुम्ही जर एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर तुमच्याकडे या महिन्यात गरम कपडे असणे फार आवश्यक आहे. जसे की तुमच्या पॅकिंगमध्ये स्वेटर, जॅकेट, पायमोजे, शूज, स्कार्फ असणे आवश्यक आहे. याबरोबर तुमच्या पॅकिंग बॅगमध्ये शरीर उबदार राहण्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि हेल्दी ड्रिंक्सचा समावेश करा.
हिवाळ्यात कोणत्याही ठिकाणी जाताना सर्वात आधी हवामानाची माहिती मिळवा. विशेषत: बर्फाळ पर्यटनस्थळी आणि पर्वतांमध्ये जाण्याचे टाळा. यामुळे तुमची संपूर्ण ट्रिप खराब होऊ शकते. म्हणून हिवाळ्याच्या महिन्यात फिरण्यासाठी योग्य पर्यटन स्थळे निवडा.
या महिन्यात फिरताना तुमच्या बॅगमध्ये मेडिसिन किट ठेवा. या मेडिसिन किटमध्ये तुम्ही ताप, सर्दी, खोकला, यांसारखी औषधे ठेवू शकता. याबरोबर तुम्ही त्या किटमध्ये तुम्हाला आवश्यक असणारी औषधे ठेवू शकता. जसे की, गॅस, पोटदुखी इत्यादी. जर तुम्हाला बीपी, मधुमेह असेल तर डॅाक्टरांच्या सल्यानुसार औषधे घ्यायला विसरु नका.
जर तुम्ही हिवाळ्यात दुसऱ्या पर्यटन ठिकाणी भेट द्यायला जात असाल तर आधीच हॅाटेलची संपूर्ण माहिती मिळवा. तुम्ही ऑनलाईन हॅाटेल देखील शोधू शकता. याबरोबर पर्यटन स्थळी येण्या अगोदर हॅाटेलची प्री-बुकिंग देखील करुन ठेवा. यामुळे तुमचा वेळ वाचेल.