ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या निरोगी शरीरासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे.
याबरोबर आहारात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबरयुक्त अन्न असायला हवे.
म्हणून आज जाणून घेऊया आहारात कोणते फायबरयुक्त पदार्थ असायला हवे.
डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेट असते म्हणून ते आपल्या पोटाला दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात.
आहारात केळी खाल्याने पोट भरलेले राहते, आणि हृद्यविकाराच्या समस्या देखील कमी होतात.
आहारात ज्वारीची भाकरी खाल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रमात राहण्यास मदत होते.
दरोरज बदाम खाल्याने आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारते, त्याबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.