रोगप्रतिकारक शक्ती

 

Saam Tv

लाईफस्टाईल

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगासने

इम्युन सिस्टम उत्तम राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोविडची बाधा होऊन आजारी पडणे हे सर्वस्वी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. अनेकदा कोरोनाची लागण होऊनही रुग्णांमध्ये त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि कालांतराने ते बरे झाल्याचे दिसून आले. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीने त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टम उत्तम राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. Yoga to boost the immune system

आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काही एक विशिष्ट घटक नाही, ती एक मोठी यंत्रणा आहे. प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे आपली आंतरिक प्रणाली असंतुलित होते. “Low immunity is unbalanced internal environment”. हे असंतुलन होतं कसं? शारीरिक-मानसिक ताण, सवयी, झोप, आहार, जीवनशैली, व्यायाम, विश्रांती व सकारात्मक विचार या सर्व गोष्टींचा आपल्या नकळत खोलवर म्हणजे अगदी पेशींपर्यंत परिणाम होत असतो. शरीर व मन या दोन्हींवर उत्तम इलाज म्हणजे योगातील विविध प्रकार. आता आपण योगासनांचा उपयोग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कसा होतो ते थोडक्यात पाहू.

हे देखील पहा -

पेशी (Cells) - विविध प्रकारच्या आसनांनी शरीराच्या भागांना आपण ताणतो, पीळ देतो किंवा प्रसरण करतो, त्याने सूक्ष्म अभिसरण (microcirculation) वाढते. सर्क्युलेशन म्हणजे साध्या शब्दात पोषक तत्त्वे आणि ऑक्सिजन सर्व पेशींपर्यंत पोहोचवणे आणि कार्बन डायऑक्साइड व विषारी द्रव्ये बाहेर फेकणे. Yoga to boost the immune system

आसने – भुजंगासन, उष्ट्रासन, सूर्यनमस्कार, मत्स्यासन, धनुरासन, ऊर्ध्वहस्तासन, अधोमुखश्वानासन, त्रिकोणासन, योगमुद्रा, हलासन इ.

लसिका संस्था (Lymphatic system) - लसिका संस्था ही रक्ताभिसरण संस्थेचा एक भाग आहे. या प्रणालीने आपल्या शरीरातील विविध टॉक्सिन्स, बॅक्टेरिया, व्हायरस यांचा नाश होतो. यामध्ये प्रामुख्याने बाहेरील संक्रमणापासून पांढऱ्यापेशी (WBC) शरीराचे संरक्षण करतात. जसे रक्ताभिसरण संस्थेसाठी हृदय पंपिंगचे काम करते, तसे लसिका संस्थेला पंप करायला कशाची गरज लागत नाही. ते गुरुत्वाकर्षण, दीर्घ श्वसन आणि शारीरिक हालचालीवर अवलंबून असते. यासाठी पीळ बसणारी आसने आणि उलट्या स्थितीतील आसने उपयोगी ठरतात. लसिका प्रणालीमध्ये संचय झाला तर रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.

आसने - विपरित करणी, सर्वांगासन, शीर्षासन, सेतुबंधासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, सूर्यनमस्कार इ.

मज्जासंस्था (Nervous System) – स्ट्रेस जर दीर्घ काळ मुरला तर कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन रक्तात वाढते आणि ते आपल्या रोगप्रतिकार शक्तीला दडपून टाकते. आसनांनी जे स्नायू आपण ताणतो त्याने मसल टेन्शन कमी होतं, रक्तातील स्ट्रेस हार्मोन कमी होतो आणि मज्जासंस्था शांत होते.

आसने – मकरासन, सुप्तभद्रासन, शशांकासन, मार्जारासन, भद्रासन, वज्रासन, मत्स्य क्रीडासन, शवासन इत्यादी.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा विजयरथ सुसाट! मतदानाआधीच आणखी एका महापालिकेत पारडं झालं जड, नेमकं काय राजकारण घडलं?

Crime: लग्नाचं खोटं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार; प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, पोलिसाचं हैवानी कृत्य

Chavali Bhaji Recipe: अस्सल गावरान पद्धतीची चवळीची भाजी कशी बनवायची?

कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी निकाल लागला; शिंदे गटाने उधळला विजयाचा गुलाल, ३ नगरसेवक बिनविरोध

Dementia Symptoms : मेंदूच्या नसा होतील खराब, डोळ्यात दिसतात हे बदल, वेळीच जाणून घ्या लक्षणं

SCROLL FOR NEXT