Yoga Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga Tips : जेवणानंतर 'हा' योग करा अपचनाची समस्या होईल मिनिटात दूर !

कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हळूहळू त्यांची पचनक्रिया बिघडू लागते.

कोमल दामुद्रे

Yoga Tips : अनेकांना वारंवार अपचन किंवा अॅसिडिटीची समस्या असते. म्हणजे तुमचे अन्न नीट पचत नाही. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हळूहळू त्यांची पचनक्रिया बिघडू लागते.

ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अन्न खाल्ल्यानंतर कोणतेही आसन किंवा व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जात असला तरी, असे एक आसन आहे जे अन्न खाल्ल्यानंतर केले जाते. पचनसंस्था सुधारून हे योगासन अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करू शकते.

वज्रासन हे जेवल्यानंतर लगेच केल्यास, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळेल. विशेषत: ज्या लोकांना जेवल्यानंतर लगेच पोटात जडपणा जाणवतो, आंबट ढेकर येते किंवा सकाळी पोट नीट साफ होत नाही. अशा लोकांनी हे आसन नक्कीच करावे. हे आसन केल्याने अपचन, अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो. (Health Tips)

वज्रासन एकच आणि त्याचे फायदेही अनेक, जाणून घ्या सविस्तर

1. वज्रासन केल्याने रक्ताभिसरण नाभीच्या केंद्राकडे राहते. त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित आजारही दूर होतात.

2. हे आसन महिलांसाठी खूप फायदेशीर (Benefits) आहे. हे आसन केल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

3. जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा बसणे आणि टीव्ही पाहणे यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. अशा स्थितीत वज्रासनाचा दररोज आपल्या दिनचर्येत समावेश केल्याने पचनाशी संबंधित समस्यांमध्ये बराच आराम मिळतो.

4. या आसनामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाचे इतर आजारही (Disease) दूर होतात.

Vajrasan

जाणून घ्या, वज्रासन करण्याची पद्धत

  • वज्रासन करण्यासाठी तुमचे दोन्ही पाय मागे वाकवा आणि गुडघ्यावर बसा. कंबर, पाठ आणि खांदे सरळ ठेवा.

  • मान सरळ ठेवून चेहरा समोरच्या दिशेने ठेवा.

  • दोन्ही हात गुडघ्याच्या वर ठेवा किंवा ध्यानाच्या मुद्रेत मांडीवर ठेवा.

  • डोळे बंद करा आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करा आणि दीर्घ श्वास घ्या.

  • काही वेळाने तुम्ही तुमच्या सामान्य स्थितीत येऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: मोठी बातमी! बाळ जन्माला येताच मिळणार सोन्याची अंगठी, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

Rohit Sharma: रोहित शर्मा बसमधून उतरताना पडला; विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉलिवूडशी संबंधित १२ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच खात्यात ₹2000 येणार, संभाव्य तारीख समोर

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT