कोमल दामुद्रे
मुलांची उंची वाढावी यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करत असतात.
किशोरावस्थेतील प्रत्येक व्यक्ती आपली उंची कमी आहे म्हणून काळजीत असतो. त्यासाठी ही योगासने करा.
भुजंगासनामुळे आपली पाठ मजबूत आणि पाठीचा कणा लवचिक होतो. हे आपल्या पाचन आणि पुनरुत्पादक प्रणाली मजबूत करते. ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होईल.
पश्चिमोत्तनासन पाठीच्या कण्यामध्ये ताण निर्माण करते आणि त्यांना लवचिक बनविण्याचे कार्य करते. याशिवाय या आसनाचा सराव केल्याने व्यक्तीची उंचीही सहज वाढू लागते.
वृक्षासनादरम्यान, तुम्ही स्ट्रेचिंगद्वारे तुमचे मन आणि शरीर स्थिर करत असता. उंचीच्या वाढीदरम्यान शरीराच्या हाडांच्या संरचनेत झपाट्याने बदल होतात
त्रिकोणासनाच्या सततच्या सरावाने घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होतात. ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
लहान मुलांमध्ये किंवा पौगंडावस्थेमध्ये मुलांनी ताडासनाचा सराव केला तर त्यांची उंची वाढण्यास मदत होते.