योगाभ्यास...पर्वतासन Saam Tv
लाईफस्टाईल

योगसाधना: जाणून घ्या, पर्वतासन करण्याचे फायदे

सध्या निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीमुळे अनेक जण मानसिक समस्यांना समोरं जात आहेत. त्यामुळेच या काळात योगसाधना आणि प्राणायाम करुन आपल्या मनाचं आरोग्य आपणच जपलं पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, असा सल्ला कायमच डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येतो. त्यानुसार, आपण हा सल्ला फॉलोदेखील करतो. परंतु, शरीराचं आरोग्य जपत असताना तुम्ही मनाचं आरोग्य जपता का? आता मनाचं आरोग्य नेमकं कसं जपायचं? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. योग आणि प्राणायाम यांच्या मदतीने आपण मनाचं आरोग्य निश्चितच जपू शकतो.

सध्या निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीमुळे अनेक जण मानसिक समस्यांना समोरं जात आहेत. त्यामुळेच या काळात योगसाधना आणि प्राणायाम करुन आपल्या मनाचं आरोग्य आपणच जपलं पाहिजे. म्हणूनच, आज आपण योगसाधनेतील पर्वतासन या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. पर्वतासनाचे फायदे कोणते ते पाहुयात.

पर्वतासन करण्याचे शारीरिक फायदे -

१. पर्वतासन केल्यामुळे पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत मिळते.

२. खांदे, हात आणि पाठ यांचे स्नायू बळकट होतात.

३. मणक्याची लवचिकता वाढते.

४. पाठीच्या कण्यामधील रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे शरीरातील नसा बळकट व कार्यक्षम होतात.

५. शरीररचनेत सुधारणा होते.

६. दररोज नियमितपणे पर्वतासन केलं तर मणक्यावर येणारा ताण कमी होतो.

७. ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात.

८. श्वासोच्छवासाशी निगडीत समस्या दूर होतात

कशा प्रकारे करावं पर्वतासन?

प्रथम पद्मासनात बसून दीर्घश्वास घेत दोन्ही हात जोडावेत. त्यानंतर जोडलेले हात डोक्याच्या वर घ्यावेत. डोक्यावर हात आल्यानंतर शक्य तितका वेळ श्वास धरुन ठेवावा (त्रास होईपर्यंत नाही). त्यानंतर हळूहळू श्वास सोडून पुन्हा पहिल्या स्थितीवर यावे. पर्वतासन करताना श्वासावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच हे आसन करताना घाई गडबड अजिबात करु नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT