Yoga For Fertility Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Fertility : महिला असो वा पुरूष, दोघांनीही केली पाहीजेत ही योगासने, फर्टिलिटीची समस्या होईल दूर

Fertility : प्रत्येक विवाहित जोडप्याला पालक बनण्याची इच्छा असते. कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी मूल हे त्यांचे कुटुंब पूर्ण करण्याचे सामाधान आहे. जोडपे मुलांच्या जन्मासाठी उत्साहि असतात आणि खूप योजनाही करतात.

Shraddha Thik

Yoga Tips :

प्रत्येक विवाहित जोडप्याला पालक बनण्याची इच्छा असते. कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी मूल हे त्यांचे कुटुंब पूर्ण करण्याचे सामाधान आहे. जोडपे मुलांच्या जन्मासाठी उत्साहि असतात आणि खूप योजनाही करतात. पण आजच्या युगात महिला आणि पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेच्या समस्या (Problem) वाढत आहेत.

बाळंतपणाशी संबंधित समस्यांसाठी स्त्री-पुरुष डॉक्टरांकडे जातात. तथापि, काही योगासने आहेत, ज्याचा सराव प्रजनन (Breeding) समस्या टाळण्यासाठी प्रभावी आहे. महिलांव्यतिरिक्त, पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा. हे योग शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर आहेत.

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी योग

सूर्य नमस्कार

मासिक पाळीत होणारी अनियमितता आणि रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या समस्यांवर हे योगासन उपयुक्त ठरू शकते. मासिक पाळी (Menstruation) दरम्यान पोटात कळ येणे कमी करण्यासाठी सूर्यनमस्काराचा सराव करा. रजोनिवृत्तीचा स्त्रीच्या गर्भाशयावर होणारा परिणाम आणि मुलाच्या जन्मावरही योगासने फायदेशीर ठरू शकतात. सूर्यनमस्कार लैंगिक ग्रंथींना नुकसानाशी संबंधित समस्यांपासून दूर ठेवतो.

बद्धकोनासन

बद्धकोनासनला फुलपाखराची मुद्रा म्हणतात. या आसनामुळे मांड्या, हिप्स आणि गुडघ्यांचे स्नायू ताणले जातात आणि शरीरात लवचिकता येते. बद्धकोनासनच्या सरावाने प्रजनन क्षमता वाढते. प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठीही हा योग प्रभावी आहे.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तनासनामुळे स्नायू ताणले जातात. या आसनाचा सराव केल्याने प्रजनन क्षमता सुधारते आणि मानसिक ताणही कमी होतो.

बालासन

प्रजनन समस्यांपासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही बालासनाचा सराव करू शकता. हे योगासन रक्तप्रवाह वाढवण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय या आसनामुळे पाठ, गुडघे, हिप्स आणि मांड्या यांच्या स्नायूंवर ताण येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून उमेदवाराच्या हातात बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा T20 चा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू, टिळक वर्माची फलंदाजीत गरूड झेप

Nagpur Breaking : नागपुरात मतदानानंतर मोठा राडा; EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड

VIDEO : महाराष्ट्रात मविआचं सरकार? काय आहे Exit Poll ची आकडेवारी, पाहा Video

Maharashtra Exit Poll : मशाल की धनुष्यबाण, राज्यात कोणाचा आवाज घुमणार? एक्झिट पोलच्या आकड्यांनी केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT