VIDEO : महाराष्ट्रात मविआचं सरकार? काय आहे Exit Poll ची आकडेवारी, पाहा Video
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर यायला लागली आहे. इलेक्ट्रोल एजच्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे. इलेक्ट्रोल एजच्या आकडेवारीनुसार महायुतीत भाजपला 78 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 26 जागा मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 14 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. तर मविआमध्ये कॉँग्रेसला 60, ठाकरे गटाला 44 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 46 जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला एकत्र 121 जागांवर विजय मिळेल असं इलेक्ट्रोल एजच्या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. तर महाविकास आघाडी 150 जागांवर विजयी होईल. अपक्ष आणि इतर 17 उमेदवार विधानसभेच्या मैदानात विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे 144चा आकडा महाविकास आघाडी सहज पार करताना दिसत आहे. तर महायुतीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.