maharashtra assembly election Exit Poll : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्ष पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खरी शिवसेना कोणाची, याचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने प्रचारासाठी राज्य पिंजून काढलं. आज मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोलमध्ये कोणत्या शिवसेनेला अधिक जागा दाखवल्या जाताहेत, हे पाहुयात.
राज्यात काही अपवाद वगळता विविध मतदारसंघात शांततेने मतदान पार पडले. आजच्या मतदानानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. मतदानानंतर समोर आलेल्या काही एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्याचे दिसत आहे. राज्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्या एक्झिट पोलनुसार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळणार, ते पाहूयात..
उद्धव ठाकरे - ३५ - प्लस
शिंदे गट - ४८ +
पोल डायरी एक्झिट पोल -
शिंदे गट - २७-५०
ठाकरे गट - १६-३५
शिंदे शिवसेना - ३७-४५
ठाकरे गट - २१-१९
ELECTORAL EDGE एक्झिट पोल-
शिंदे शिवसेना -२६
ठाकरे गट - ४४
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा दोन्ही गट लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे ९ खासदार निवडून आले. तर शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्ट्राइक रेटची जोरदार चर्चा सुरु होती. तर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९५ जागा लढवल्या होत्या. तर शिंदे गटाने ८१ जागा लढवल्या होत्या.
नोट - मतदानानंतर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. एक्झिट पोलची ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ नोव्हेंबरनंतर राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याविषयी चित्र स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.