Yoga For Asthma Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Asthma : वाढत्या प्रदूषणात होतोय दम्याचा त्रास, ही योगासने फायदेशीर ठरतील

Asthma Precautions : प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांसोबत दम्याच्या रुग्णांनाही जास्त धोका असल्याचे आढळते.

Shraddha Thik

Yoga Tips :

नोव्हेंबर आला की वातावरणात बदल होण्यास सुरूवात होते. त्यात अनेकांची जीवनशैली ही सध्या व्यस्त झाली आहे. बदलत्या या वातावरणामुळे वायू प्रदूषणाचा धोका वाढत चालला आहे. या प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांसोबत दम्याच्या रुग्णांनाही जास्त धोका असल्याचे आढळते. यासाठी दम्याच्या रुग्णांनी दररोज ही योगासने करणे गरजेचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दम्याचा आजार वाढला तर मृत्यूही होऊ शकतो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी दम्याचा रुग्ण असेल, तर खाण्यापिण्यात आणि जीवनशैलीत काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच दम्याची तीव्रता कमी करण्यात योगाचाही मोठा वाटा आहे. दमा हा आजार कुणालाही होऊ शकतो, पण या आजाराची लक्षणे (Symptoms) कळताच योगासने सुरू केली तर तो बऱ्याच अंशी आटोक्यात ठेवता येतो. तर जाणून घ्या दम्यासाठी कोणते योग प्रभावी आहेत.

भुजंगासन

भुजंगासन

दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी भुजंगासन योग (Yoga) हे खूप चांगले आसन आहे. यामुळे श्वास घेण्याची क्षमता सुधारते.

सेतुबंधासन

सेतुबंधासन

सेतुबंधासन हे दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आसन आहे. याच्या नियमित सरावाने फुफ्फुसे आणि छाती उघडतात, ज्यामुळे श्वासोच्छ्वास आणि श्वासोच्छवासातील समस्या दूर होतात.

शलभासन योग

शलभासन योग

शलभासनाच्या सरावाने दम्याच्या रुग्णांनाही खूप आराम मिळतो. यामुळे श्वासोच्छवासातील समस्याही दूर होतात.

धनुरासन

धनुरासन

दम्याच्या रुग्णांसाठी धनुरासन करणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. हे योग आसन तुमच्या फुफ्फुसांना मजबूत करते. त्याचा सराव सुरुवातीला कठीण असू शकतो, त्यामुळे हळूहळू त्याचा वेग वाढवा.

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन

पवनमुक्तासनाचा रोजचा सराव शरीरातून प्रदूषित हवा काढून टाकतो. दम्यासोबतच हे आसन पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आराम देते.

शवासन

शवासन

शवासनाचा रोजचा सराव दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी ठरतो. याशिवाय तणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार दूर करण्यासाठीही हे आसन फायदेशीर मानले जाते. शवासन केल्याने स्मरणशक्तीही वाढते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT