Yoga For Stomach Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Stomach: पोट साफ होत नाहीये? सकाळी उठल्यावर करा ही योगासने, काही मिनिटात पडेल फरक

Yoga Asnas For Stomach: पोट साफ होत नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही सकाळी सकाळी ही योगासने केल्यावर तुम्हाला आराम मिळेल. तुमची पचनक्रिया सुधारेल.

Siddhi Hande

सकाळी सकाळी पोट साफ होत नाहीये?

ही योगासने करा लगेच होईल परिणाम

पचनक्रिया सुधारेल आणि कफदेखील होणार नाही

सध्याच्या काळात अनेक गोष्टींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बदलती जीवनशैली, शरीरासाठी चांगले नसणारे अन्नपदार्थ जसे की फास्टफूड, बाहेरचे पदार्थ यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होते. यामुळे कफदेखील होतो. यामुळे डोकेदुखी, आळस, मानसिक ताण येऊ शकतो.

अनेकदा या सर्व अन्नपदार्थ्यांमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. अन्न पचत नाही, परिणाम पोट साफ होत नाही. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकतात. पोटाच्या आजारांवर सर्वात चांगला उपाय म्हणजे योगासने. तुम्ही ही योगासने करा तुमचे पोट आपोआप साफ होईल.

ब्रिज पोझ

तुम्ही ब्रिज पोझ करु शकतात. हे शरीराला ब्रिजच्या आकारात ठेवते. दोन्ही हात जमिनीला टेकलेले आणि पोट वरती असं आसन आहे. यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. रक्त परिसंचरण वाढवले. यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

मालासन

मालासन ज्याला गारलँड पोझ असेही म्हणतात. यामुळे पेल्विक फ्लोअर आणि पोटांचे स्नायू सक्रिय होतात. यामुळे आतड्यांना उत्तेजन मिळते. दररोज हे आसन केल्याने आतड्यांची चांगली हालचाल होते.

पश्चिमोत्तानासन

या आसनात पुढे वाकावे लागते. यामुळे पोटावर हलका दाब पडतो. यामुळे आतड्या चांगल्या काम करतात. पचनसंस्था सूधारते परिणामी बद्धकोष्ठता दूर होते.

मार्जारियासन आणि बिटिलासन

या दोन्ही आसनांमध्ये पाठीचा कणा वाकवावा लागतो. यामुळे पोटाची मालिश करण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो.

भुजंगासन

हे आसन पोटातील नसा उत्तेजित करते यामुळे अवयवांमध्ये ऊर्जा निर्माण होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Advice: लग्न झाल्यानंतर या 5 गोष्टी व्यक्त करताना सावध राहा, नात्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, पुढील ३ तास महत्त्वाचे

PM Modi : मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा; मोदी मंत्रिमंडळात खळबळ

Smart Meter : अचानक वीज बिल दुप्पट-तिप्पट, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जोरदार 'शॉक', राज्यात संतापाचे वातावरण

Shocking : नाशिक हादरलं! विवाहित पुरुषाचं अल्पवयीन मुलीसोबत अमानुष कृत्य, वारंवार अत्याचार; गर्भवती राहताच...

SCROLL FOR NEXT