Manasvi Choudhary
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपण फार दमतो. आपल्या आरोग्याकडे आपले लक्ष राहत नाही यासाठी योगा हे महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यानंतर दररोज १० मिनिटे योगासने केल्याने संपूर्ण दिवसभर मूड फ्रेश राहतो.
निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे महत्वाचे आहे. योगा केल्याने शरीर तंदुरूस्त राहते.
किमान ३ ते ५ वेळा सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कारमध्ये १२ आसने आहेत जे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी फायद्याचे आहेत.
वृक्षासन केल्याने कंबर आणि पायांच्या हाडांचे आरोग्य सुधारते तसेच एकाग्रता वाढवण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत होते.
दोन्ही हात वर करून पायांच्या चवड्यावर उभे राहा आणि संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ओढा यामुळे शरीरातील आळस दूर होतो
सुखासनात बसून एका नाकपुडीने श्वास घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडा यामुळे मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो, तणाव कमी होतो