Manasvi Choudhary
डायबिटीजवर नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ औषधे नाही तर शरीराची हालचाल देखील महत्वाची आहे.
रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही रोज घरीच योगासने करणे गरजेचे आहे.
मांडूकासन हे आसन डायबिटीज असलेल्यांनी करणे फायदेशीर आहे. मांडूकासनामध्ये तुम्हाला वज्रासनात बसून हातांच्या मुठी वळून त्या नाभीच्या दोन्ही बाजूला ठेवून श्वास सोडत पुढे वाकून समोर पाहायचे आहे.
वक्रासन योगामध्ये पाय समोर पसरून बसा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या गुडघ्याजवळ ठेवा. डावा हात उजव्या पायावरून नेऊन उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजव्या बाजूने मागे वळून पहा.
पश्चिमोत्तानासन योगासनामध्ये पाय सरळ पसरून बसा. श्वास सोडत पुढे वाका आणि हातांनी पायाचे अंगठे पकडा. कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा.
. भुजंगासन योगासनामध्ये पोटावर पालथे झोपा. दोन्ही हात खांद्यापाशी ठेवून शरीराचा पुढचा भाग नाभीपर्यंत वर उचला.
शशांकासन योगासनामध्ये तुम्हाला वज्रासनात बसून दोन्ही हात वर करा. श्वास सोडत हळूहळू पुढे वाका आणि कपाळ व हात जमिनीला टेकवा.