Xiaomi SU7 Saam Tv
लाईफस्टाईल

Xiaomi घेऊन येत आहे जबरदस्त कार, कमी किंमतीत मिळणार लक्झरी फीचर्स; जाणून घ्या किंमत

Xiaomi SU7: Xiaomi घेऊन येत आहे जबरदस्त कार, कमी किंमतीत मिळणार लक्झरी फीचर्स; जाणून घ्या किंमत

Satish Kengar

Xiaomi SU7:

स्मार्टफोन, टीव्ही, घड्याळे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या Xiaomi या कंपनीने आता इलेक्ट्रिक कार बनवली आहे. कंपनीने यासाठी चीन सरकारकडे अर्ज केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एक लक्झरी कार असेल. Xiaomi कारचे तीन प्रकार सादर करेल, SU7, SU7 Pro आणि SU7 Max. कारची लांबी 4997 मिमी असेल. ही कार BYD सील आणि BMW i4 च्या कारशी स्पर्धा करेल.

Xiaomi SU7 चे टायर 19 आणि 20 इंच आकाराचे असतील. यात टचस्क्रीन सिस्टीम, डिजिटल डिस्प्ले यांसारखी फीचर्स असतील. सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग्ज आणि इतर दमदार फीचर्स दिले जाऊ शकतात. कारमध्ये रियर व्हील ड्राइव्ह आणि 4 व्हील ड्राइव्ह दोन्ही पर्याय असतील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारला 495 kW आणि 220 kW च्या दोन पॉवरट्रेन मिळतील. यात ड्युअल मोटर दिली जाईल, ज्यामुळे याला हाय स्पीड आणि पॉवर मिळेल. ही नवीन जनरेशन कार असेल, ज्यामध्ये सर्व अॅडव्हान्स फीचर्स असतील. जागतिक बाजारपेठेनंतर ही कार भारतातही लॉन्च होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लोक स्वस्तात ईव्ही वाहने खरेदी करू शकतील. (Latest Marathi News)

Xiaomi SU7 परवडणाऱ्या किमतीत हाय क्लास प्रॉडक्ट देण्यासाठी ओळखले जाते. या कारमध्ये एलईडी लाईट, क्रूझ कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि अलॉय व्हील देखील मिळू शकते. कारचे आतील भाग लक्झरी फील देईल. आरामदायी सीट्स व्यतिरिक्त, यात ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देखील मिळू शकते. ही कार एका चार्जमध्ये जबरदस्त रेंज देऊ शकते. सध्या कंपनीने कारच्या लॉन्च तारखेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

Xiaomi SU7 च्या विविध प्रकारांना 210 kmph आणि 265 kmph चा टॉप स्पीड मिळेल. ही हायस्पीड कार असेल, जी काही सेकंदात 100 किमी प्रतितास वेग गाठेल. कारची रुंदी 1963 मिमी आणि लांबी 1455 असेल. ही कार 3000 मिमीच्या व्हीलबेससह येईल. त्यामुळे खराब रस्त्यांवर वाहन चालवणे सोपे होईल. इलेक्ट्रिक सेडान सेगमेंटमधील ही कार असेल. याच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT