World Tourism Day 2023 Saam tv
लाईफस्टाईल

World Tourism Day 2023 : लाँग ट्रिपसाठी बेस्ट ऑप्शन! 10 लाखात खरेदी करा या जबरदस्त कार, पाहा लिस्ट

Best Car For Travelling : प्रवासासाठी त्यांना स्वत:ची कार किंवा बाइक खरेदी करण्याच्या नियोजनात असतात.

कोमल दामुद्रे

Top 3 Cars for Memorable Road Trips under INR 10 Lakh :

आज जगभरात जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात आहे. बरेचदा प्रवास करताना तो सुकर आणि आनंददायी व्हावा यासाठी आपण अनेक गोष्टींची पूर्व तयारी करतो. अनेक लोक फिरण्याचे शौकिन असतात. प्रवासासाठी त्यांना स्वत:ची कार किंवा बाइक खरेदी करण्याच्या नियोजनात असतात.

अनेकदा लाँग वीकेंड किंवा फॅमिली ट्रिपला जाण्यासाठी कार खरेदी करतात पण प्रवास मनसोक्त करता येत नाही. जर तुम्हाला देखील प्रवास अधिक मजेशीर करायचा असेल तसेच बजेटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० लाखाच्या आत येणाऱ्या या जबरदस्त कारची लिस्ट पाहा

1. रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट ट्रायबर ही भारतातील सगळ्यात सुरक्षित समजली जाणारा कार (Car) आहे. याची किंमत ६.३३ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये सात लोक बसून आरामात प्रवास (Travel) करु शकतात. याच्या डिझाइन आणि इतर वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांच्या चांगल्या पंसतीस पडली आहे. लाँग ट्रिपसाठी ही कार अगदी सुकर आहे.

2. महिंद्रा XUV

महिंद्राने नुकतेच XUV300 चे नवीन प्रकार लॉन्च केला आहे. या कारची किंमत (Price) ७.९९ लाख रुपये आहे. यामध्ये 1.2 लीटर m stallion TGDI पेट्रोल इंजिनद्वारे देण्यात आले आहे. यामध्ये टर्बोचार्ज केलेल्या पर्यायांची संख्या वाढवते. या कारमध्ये ग्राहकांना अधिक चांगले फीचर्स मिळतात. यामध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, वायपर, स्टीयरिंग मोड, रियर पार्किंग कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि सनरूफ यांचा समावेश आहे. प्रवास करण्यासाठी ही कार सगळ्यात बेस्ट समजली जाते.

3. Hyundai Venue

Hyundai Venue ही एक स्पोर्ट्स लुक SUV आहे. याची किंमत ७.७७ लाख इतकी आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple CarPlay, रिक्लाइनिंग रीअर सीट्स, ऑनबोर्ड व्हॉईस कमांड आणि स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. तसेट पेट्रोल-डिझेलचे दोन्ही प्रकार यामध्ये आहेत. लाँग वींकेडसाठी बेस्ट पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT