जागतिक पर्यटन दिन २०२१: जागतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील या ठिकाणी भेट द्यायलाच हवी Saam Tv News
लाईफस्टाईल

जागतिक पर्यटन दिन २०२१: जागतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील या ठिकाणी भेट द्यायलाच हवी

आठवड्याचे पाच-सहा दिवस काम करुन आपण आतुरतेने वाट बघत असतो ती म्हणजे सुट्टीची. या दिवशी आपण एकतर दिवसभर आराम करतो किंवा बाहेर फिरायला जातो. आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त आपण या ठिकाणांची माहिती घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आठवड्याचे पाच-सहा दिवस काम करुन आपण आतुरतेने वाट बघत असतो ती म्हणजे सुट्टीची. या दिवशी आपण एकतर दिवसभर आराम करतो किंवा बाहेर फिरायला जातो. मानसशास्त्रानुसार सुटी ही लहान मुलांपासून ते नोकरदार मंडळीपर्यंत सर्वांसाठी अत्यंत गरजेची असते. सुटीत पर्यटन करण्यात वेगळीच मजा असते. आपल्या लाडक्या महाराष्ट्रात पाहण्यासारखे असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय महाराष्ट्रात लोकप्रिय अशी युनेस्को जागतिक वारसा स्थळं (UNESCO World Heritage Sites) देखील आहेत. आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त आपण या ठिकाणांची माहिती घेणार आहोत. (World Tourism Day 2021: A World Heritage Site in Maharashtra)

हे देखील पहा -

जागतिक पर्यटन स्थळांचा इतिहास

जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

अजिंठा लेणी (Ajanta Caves)

अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४ थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत.

वेरूळ लेणी (Ellora Caves)

वेरूळची लेणी ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे, राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (757-783) मध्ये बांधण्यात आले होते. हे एलोरा(वेरुळ) जिल्हा औरंगाबाद येथे स्थित आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

एलिफंटा लेणी (Elephanta Caves)

घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली होती. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनार्‍यापासून १० कि.मी. दूर आहेत.

व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्ब्ल्स (Victorian Gothic and Art Deco Ensembles of Mumbai)

मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल हे 19 व्या शतकातील व्हिक्टोरियन नियो गॉथिक सार्वजनिक इमारती आणि 20 व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा संग्रह असून, तो महाराष्ट्रातील मुंबईच्या फोर्ट परिसरात संग्रह आहे. दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको इमारतींचा हा समूह मियामीनंतर जगातील सर्वात मोठा इमारत समूह आहे. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचे उत्तम उदाहरण आहे.

कास पठार (Kaas Plateau)

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.

माहितीस्त्रोत: विकीपीडिया

Edited By: Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

SCROLL FOR NEXT