World Photography Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Photography Day 2023 : तु खिच मेरी फोटो...,पहिला फोटो केव्हा आणि कसा काढला असावा? जाणून घ्या

World Photography Day : प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपल्या आठवणी केवळ फोटोंच्यामाध्यमातूनच पाहतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Photography Day 2023 : प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपल्या आठवणी केवळ फोटोंच्यामाध्यमातूनच पाहतात. फोटोंचे हे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.

तसे, फोटो प्रत्येकासाठी खास असतात कारण ते त्यांच्या आयुष्याशी संबंधित भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी देतात. पण जगाच्या इतिहासात फोटोचे (Photo) महत्त्वही समजून घेणे आवश्यक आहे. कारण इतिहासाच्या पानात काय नोंद आहे हे फोटोंद्वारेच कळते.

फोटोंच्या माध्यमातून प्रत्येकाचा इतिहास जपणाऱ्या जागतिक फोटोग्राफी दिनाच्या फोटोचा स्वतःचा वेगळाच इतिहास आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा (Celebrate) करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये 1837 मध्ये झाली. फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डॉगर यांनी 19 ऑगस्ट रोजी या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर तेथील तत्कालीन सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो.

पहिला फोटो काढण्यासाठी इतका वेळ लागला

आजच्या युगात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी एकाहून अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. तसेच कोणताही क्षण सेकंदात टिपण्यासाठी प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन उपलबद्ध असतात. पण पहिला फोटो काढताना किती आणि कोणत्या अडचणींसह ते कसे शक्य झाले असावे? तर, 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस नावाच्या व्यक्तीने फिलाडेल्फियामधील आपल्या वडिलांच्या दुकानाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा लावला आणि नंतर तो फोटो क्लिक केला. त्यानंतर फोटो काढल्यानंतर सुमारे 3 मिनिटांनी पोर्ट्रेट चित्र बाहेर आले.

उद्देश

वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याचा उद्देश फोटो कलेचा प्रचार करणे हा आहे. त्यानिमित्ताने या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि फोटोंचे प्रदर्शनही आयोजित केले जाते. ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध फोटोग्राफरांनी क्लिक केलेली दुर्मिळ फोटोंज प्रदर्शित करण्यात येतात.

वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त देशभरात या कार्यक्रमाची थीम आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दरवर्षी एक थीम (Theme) ठरवली जाते. या वर्षी जागतिक फोटोग्राफी दिन 2023 साठी 'लँडस्केप' ही थीम निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT