ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चांदेकर हे जोडपं नेहमीच अनेक ठिकाणी फिरायला गेलेले आपण त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहत असतो.
आत्ताही त्यांनी काही मस्त फोटोज त्यांच्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.
सध्या मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर जंगल सफारीचा आनंद लुटताना पहायला मिळत आहेत.
त्या दोघांनी फोटोला दिलेल्या लोकेशननुसार दोघे सध्या 'कान्हा नॅशनल टायगर रिजर्व्ह फॉरेस्ट'मध्ये आहेत.
'कान्हा नॅशनल टायगर रिजर्व्ह फॉरेस्ट'मध्ये प्राण्यांचे काढलेले फोटो त्यांनी आपल्या इन्स्टावर शेअर केले आहेत.
विविध प्राण्यांचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
त्यांच्या या फोटोंमध्ये पिसारा फुलवलेला मोर, बसलेला वाघ, हरिण असे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सिद्धार्थ आणि मिताली यांच्या मुंबईतील घराजवळही याआधी बिबट्या आला होता. त्याचा फोटो देखील सिद्धार्थने शेअर केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.