World Longest Train
World Longest Train Saam Tv
लाईफस्टाईल

World Longest Train : 'या' जगात आहे देशातील सगळ्यात लांब ट्रेन, पाहाल तर थक्क व्हाल

कोमल दामुद्रे
World Longest Train

जगातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गावर जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन धावत आहे. स्विस रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास (Travel) करून तुम्ही जगातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गाचा आनंदही घेऊ शकता.

The Rhaetian Railway

जगातील सर्वात लांब ट्रेनचा किताब स्वित्झर्लंडला मिळाला आहे. या ट्रेनची क्षमता 4550 आसनांची आहे, जी एकाच वेळी 7 चालक उत्तम पद्धतीने चालवू शकतात. यामुळे स्वित्झर्लंड आता जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन (Train) चालवणारा देश बनला आहे.

The Rhaetian Railway

स्विस रेल्वेशी संलग्न असलेल्या राएटियन रेल्वे कंपनीने 100 कोच असलेली सुमारे 2 किलोमीटर लांब (1.2 मैल लांब) ट्रेन चालवली. स्विस रेल्वेच्या 175 व्या वर्धापन दिनानिमित्त रॅटियन रेल्वेने हा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला असला, तरी या रेल्वे प्रवासातून स्वित्झर्लंडच्या सुंदर रेल्वे मार्गाचे सौंदर्य जगाला दाखवायचे आहे.

The Rhaetian Railway

'द रेहतियन रेल्वे' (The Rhaetian Railway RhB) RhB कंपनीने बनवलेली ही ट्रेन 22 बोगदे आणि 48 पुलांमधून गेली. ही ट्रेन युनेस्कोच्या जागतिक वारसा अल्बुला/बर्निना मार्गावर धावली. हे 2008 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले गेले. या सुंदर मार्गाची चर्चा जगभरात आहे.

The Rhaetian Railway

युरो न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्विस रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4550 जागा आणि 7 चालकांसह स्वित्झर्लंड आता जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन चालवणारा देश बनला आहे.

The Rhaetian Railway

रेल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या काळात या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या सर्व सेवांच्या कामकाजावर वाईट परिणाम झाला होता. ज्याचा रेल्वेच्या कमाईवरही वाईट परिणाम झाला. कंपनीला आशा आहे की या ट्रेनमुळे जगभरातील पर्यटक पुन्हा एकदा या मार्गावरील ट्रेन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी परततील.

The Rhaetian Railway

एका अंदाजानुसार दोन वर्षांपूर्वी रेल्वे विभागाचा 30 ते 35 टक्के व्यवसाय बुडाला होता. आता पुन्हा एकदा देशातील पर्यटन क्षेत्राला वेग आला आहे. अशा परिस्थितीत सर्व सरकारी आणि खाजगी कंपन्यांना आशा आहे की सर्व काही पूर्वीसारखेच होईल.

The Rhaetian Railway

या संपूर्ण प्रवासाला तासाभराचा कालावधी लागला. आल्प्समधून सुमारे 25 किलोमीटर (15.5 मैल) अंतरावरील ट्रेनचे 25 विभाग पाहण्यासाठी रेल्वे उत्साही दरीत रांगा लावतात.

The Rhaetian Railway

ही ट्रेन स्विस रेल्वेच्या 175 व्या वर्धापन दिनानिमित्त धावली होती. Rhaetian रेल्वेचे CEO सांगतात की आम्ही आमच्या सुंदर युनेस्कोच्या जागतिक वारसाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी ही ट्रेन चालवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महाबळेश्वर पाचगणी वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त

Hair Care tips: रात्री केस विंचरुन झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणी हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक

Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळल्या प्रकरणी मोठी कारवाई; मालकाविरोधात गुन्हा दाखल, बीएमसीने ठोठावला कोट्यवधींचा दंड

CCTV Footage: धक्कादायक! टोलचे पैसे द्यायचे नव्हते, महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर थेट चढवली कार; घटना CCTV कॅमेरात कैद

SCROLL FOR NEXT