Ravivar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Sunday Remedies : रविवारच्या दिवशी अडकलेली कामं लगेच होतील; फक्त करावे लागणार हे सोपे उपाय

Sunday remedies for work: रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. जर तुमचे कोणतेही काम वारंवार अडकत असेल किंवा त्यात यश मिळत नसेल, तर रविवारी काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित केलेला असतो. असाच रविवारचा दिवस भगवान सूर्य नारायणाला समर्पित मानला जातो. हा दिवस विशेष मानला जातो कारण सूर्यदेव केवळ तेजाचंच नव्हे तर आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि मनःशांतीचेही प्रतीक मानलं जातं.

अशावेळी जर रविवारच्या दिवशी श्रद्धेने सूर्याची पूजा आणि काही खास उपाय केले, तर आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होते. यामुळे घरात सुख-शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. अशावेळी तुम्ही कोणते उपाय तुमच्या फायद्याचे असू शकतात ते पाहूयात.

रविवारी कोणते उपाय करू शकता

आर्थिक तंगी दूर करा

जर घरात आर्थिक तंगी असेल किंवा पैशांची अडचण वारंवार भेडसावत असेल, तर रविवारच्या सकाळी आंघोळीने शुद्ध झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण केलं पाहिजे. यावेळी पाण्यामध्ये थोडं कुंकू किंवा लाल चंदन मिसळून तांब्या किंवा पितळेच्या भांड्यातून अर्पण करावं. जल अर्पण करताना "ॐ सूर्याय नमः" असा जप करा. यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना तुपाचा दिवा लावा आणि देवी लक्ष्मी व सूर्यदेवाची मनोभावे प्रार्थना करा.

रात्री झोपताना दूध ठेवा

जर तुम्हाला नशीब उजळवायचं असेल तर रविवारच्या रात्री झोपताना आपल्या उशीजवळ एका ग्लासात दूध ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते दूध बाभळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. यामुळे सौभाग्य वाढतं आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतात.

कर्जातून सुटका हवी असल्यास

जर तुमच्यावर भरपूर कर्ज असेल आणि तुम्ही कर्जात अडकलेले असाल आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठ एक उपाय आहे. यामध्ये रविवारच्या दिवशी तीन नवीन झाडू विकत आणा. त्या झाडू घराच्या नैऋत्य दिशेला ठेवावा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झाडू जवळच्या शिवमंदिरात नेऊन दान करा.

अकडलेलं काम कसं पूर्ण कराल?

रविवारी जर एखादं महत्वाचं काम वारंवार अडत असेल तर हा उपाय तुमच्या फायद्याचा आहे. आजच्या दिवशी पूजा करताना न विसरता तिलक लावा. शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे परिधान करा. यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो आणि कामात अडथळे येत नाहीत.

गायत्री मंत्राचा जप

जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत हलं असेल तर रविवारी पूजा करताना गायत्री मंत्राची एक माळ जपा. गायत्री मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जा देणारा मंत्र आहे. याच्या नियमित जपामुळे मन शांत राहतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT