Relationship With Husband and Parents Saam TV
लाईफस्टाईल

Relationships Tips : मुलींना सासू-सासरे यांच्याबरोबर रहायला का आवडत नाही? वाचा महत्वाची कारणे

Relationship With Husband and Parents : सध्याच्या काळात मुलींना सासू-सासरे घरात नसावेत असं वाटतं, याची नेमकी कारणे काय आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

लग्नानंतर प्रत्येक मुलगी आपलं माहेर सोडून सासरी जाते. सासरी गेल्यावर तेथील सर्व नवीन व्यक्तींशी जुळतं मिळतं घ्यायला त्यांना वेळ लागतो. पूर्वी मुलींना सासू आणि सासरे यांच्याकडून फार त्रास दिला जायचा. मात्र आता काळ बदलला आहे. मुली शिक्षण घेतात आणि नोकरी करतात त्यामुळे सासरच्या व्यक्तींनी त्रास दिल्यास त्या पतीसह वेगळ्या घरात राहण्याचा निर्णय घेतात. आता मुलींना सासू-सासऱ्यांसह रहावं न वाटण्याची अनेक कारणे आहेत. त्याबद्दलच आज माहिती जाणून घेणार आहोत.

दुसऱ्यांशी तुलना करणे

प्रत्येक घरात मुली असतात. आपल्या मुली सासरी गेल्यावर घरी सूनबाई येतात. सून आणि मुलगी यांच्यात भरपूर फरक असतो. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना समजून घेणे महत्वाचे असते. मात्र बऱ्याचदा व्यक्ती आपल्या सूनेची तुलना मुलीशी किंवा अन्य कोणत्याही महिलेशी करतात. असे केल्याने मुलींच्या मनात सासरच्या व्यक्तींविषयी द्वेष निर्माण होतो. त्यामुळे त्यांना सासू-सासरे घरी आलेले आवडत नाहीत.

खोटं बोलणे किंवा सत्य लपवणे

लग्न झाल्यावर मुलीसाठी पतीचं घर हेच तिचं घर असतं. पतीचे आई वडील तिचे आई वडील असतात. आपल्या आई बाबांसह मुली घराची संपूर्ण काळजी घेतात. घराची काळजी घेताना त्यांना घरातील सर्व गोष्टींची माहिती असली पाहिजे. मात्र अनेकदा सासू-सासरे सूनेला सत्य काहीच सांगत नाही. जेव्हा सूनेला सत्य काय आहे ते समजते तेव्हा सासू सासऱ्यांबद्दल त्यांच्या मनात द्वेष निर्माण होतात.

कपड्यांवर कमेंट करणे

मुलींना त्यांना हवे तसे कपडे परिधान करणे आवडतात. मात्र बऱ्याच घरात सासू-सासरे मुलींनी साधी जिन्स पँट घातली तरी त्यांना ओरडतात आणि बडबड करतात. भरपूर बंधने लावल्याने मुलींना सासरी राहण्यापेक्षा कैदखाण्यात रहावे असे वाटते.

पतीसह जास्त वेळ न घालवू देणे

लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलगी फक्त पतीवर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर दुसऱ्या घरी राहते. अशावेळी तिला पतीचा सर्वात मोठा आधर असतो. त्यामुळे पतीसह तिला सतत चांगल्या गप्पा गोष्टी कराव्या, छान वेळ घालवावा असं वाटतं. मात्र काही ठिकाणी सासूबाई आपल्या सूनबाईंना भरपूर कामे करण्यास सांगतात. त्यामुळे मुलींना पतीसह कॉलिटी टाइम घालवता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT