Women Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Women Health Tips : प्रेग्नेंसीनंतर स्त्रियांचे पोट पुढे का येते ? अशावेळी काय कराल ?

जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यात तिचा संपूर्ण दिवस जातो ज्यामुळे तिला स्वत:च्या आरोग्याकडे हवे तसे लक्ष देता येत नाही.

कोमल दामुद्रे

Women Health Tips : आई होण्याचा काळ हा फार सुखद असतो परंतु, गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यात तिचा संपूर्ण दिवस जातो ज्यामुळे तिला स्वत:च्या आरोग्याकडे हवे तसे लक्ष देता येत नाही.

बरेचदा गर्भधारणेनंतर महिलांमध्ये पोटाची चरबी वाढली जाते. तसेच पोटावर स्ट्रेच मार्क देखील येतात. प्रसूतीनंतर महिलांना अनेकदा पोटावर चरबीची समस्या असते. अनेक स्त्रिया (Women) प्रसूतीनंतर त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात आणि त्यातून सुटका करून घेतात, परंतु काहींना ही समस्या दीर्घकाळ असते. अशा स्थितीत या समस्येतून सुटका कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रसूतीनंतर पोटातील चरबीची समस्या

गर्भधारणेदरम्यान, महिलांच्या गर्भाशयाचा आकार वाढतो. प्रसूतीनंतरही गर्भाशयाचा आकार वाढतच राहतो त्यामुळे पोट फुगलेले दिसते. वेळेत व्यायाम आणि योग्य खाण्याच्या सवयी लागल्यास हळूहळू कमी होत जाते. या प्रक्रियेला इन्व्हॉल्यूशन म्हणून ओळखले जाते.

प्रसूतीनंतर पोटाची चरबी कशी कमी करावी ?

  • तज्ज्ञांच्या मते, व्यायामासाठी जास्त वेळ घेऊ नका, परंतु गर्भधारणेच्या दोन दिवसांनंतरच तुम्ही हलका व्यायाम सुरू करू शकता. याला आयसोमेट्रिक आकुंचन असे म्हटले जाते.

  • हा व्यायाम केल्याने ओटीपोटाचा भाग, पोट आणि पाठीचा खालचा भाग मजबूत होतो.

  • असे व्यायाम प्रसूतीच्या 4 ते 6 आठवड्यांनंतरच सुरू करता येतात. जेणेकरून तुमच्या शरीरावर कोणताही दबाव येणार नाही.

  • बहुतेक व्यायामांसाठी, पाठीचा, ओटीपोटाचा आणि पोटाचा वर उल्लेख केलेला हलका व्यायामच करा. तुम्ही शरीर आणि मान ताणणारे व्यायाम देखील करू शकता.

  • व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलण्याची खात्री करा. आठवड्यातून 2-3 वेळा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या व्यायामासोबतच शरीर स्ट्रेच करण्यावर भर द्या.

  • व्यायामासोबतच चालणेही खूप महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी (Water) प्या आणि आहाराची विशेष काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KTM 160 Duke: केटीएमची भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

SCROLL FOR NEXT