Women Health Saam Tv
लाईफस्टाईल

Women Health : आरोग्याच्या 'या' 5 लक्षणांकडे महिला करतात नेहमी दुर्लक्ष, जडतात अनेक आजार !

महिलांनी या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये

कोमल दामुद्रे

Women Health : दिवसभर कामाच्या गडबडीमुळे किंवा घरकामामुळे स्त्रियांना अनेकदा स्वत:साठी वेळ मिळत नाही. यामुळे त्यांचे त्यांच्या आरोग्याकडे सतत दुर्लक्ष होते. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वेळेचा अभाव, काम किंवा घरातील ताण, लैंगिक आरोग्य यामुळे देखील त्या सतत चिंतेत असतात.

स्त्रियांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की त्यांना वरवर सामान्य दिसणार्‍या आरोग्याच्या समस्या ही येणा-या मोठ्या समस्येचे कारण असू शकते. आज आपण याबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवणार नाही

महिलांनी या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये

1. अचनाक वजन कमी होणे -

अचानक वजन कमी झाल्यावर महिला अधिक आनंदी असतात परंतु, Mfine नुसार ते टीबी, कर्करोग किंवा थायरॉईड सारख्या आजारांचे लक्षण असू शकते. एवढेच नाही तर अचानक वजन वाढल्यास ते PCOD किंवा थायरॉईडमुळे असू शकते.

2. सततचा थकवा येणे-

8 तासांची झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ते हृदय, मूत्रपिंड, यकृत, रक्त किंवा प्रजनन समस्यांचे लक्षण असू शकते.

3. चक्कर येणे व डोकेदुखी -

थकव्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर त्याचे एक कारण तणाव असू शकते. पण जर हे लक्षण जास्त दिसले तर ते जीवनसत्त्वे (Vitamins) आणि लोहाच्या कमतरतेमुळे असू शकते. याशिवाय, हे तुमच्या हृदयातील समस्येचे कारण देखील असू शकते.

4. जास्त केस गळणे-

दिवसातून 50 ते 100 वेळा केस गळणे सामान्य आहे पण जर जास्त केस गळत असतील तर ते ऑटो इम्यून सिस्टम डिसऑर्डर किंवा थायरॉईडचे लक्षण देखील असू शकते.

5. गॅसची समस्या-

मासिक पाळीच्या आधी महिलांमध्ये (Women) गॅसची समस्या ही एक सामान्य समस्या आहे. पण जर तो बराच काळ टिकला आणि त्यासोबतच वायू तयार होणे, वेदना होणे, जास्त रक्तस्त्राव होणे इत्यादी होत असेल तर ते एंडोमेट्रिओसिसचे लक्षण असू शकते. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोगही होऊ शकतो.

6. मासिक पाळीत वारंवार होणारे बदल-

ही देखील एक अतिशय सामान्य समस्या आहे जी कोणत्याही स्त्रीला होऊ शकते. परंतु कधीकधी ही लक्षणे गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, थायरॉईड समस्यांमुळे देखील असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

SCROLL FOR NEXT