Health Tips saam tv
लाईफस्टाईल

Health Tips: महिलांनो...थांबून-थांबून लघवी होण्याचा त्रास होतोय? 'या' 4 गंभीर आजारांचं असू शकतं लक्षण

Intermittent Urination Reasons: अधूनमधून लघवी होणं हे गंभीर आरोग्याच्या समस्येचं लक्षण ठरू शकते. सध्या लोकांच्या जीवनशैलीत आणि आहारात होणारे बदल त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रभावित करत आहेत

Surabhi Jayashree Jagdish

जेव्हा शरीरात कोणतीही समस्या असते तेव्हा त्याची काही लक्षणं लघवीमध्ये दिसून येतात. लघवीमध्ये बदल आणि लघवी करताना येणाऱ्या समस्या हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे लघवीमध्ये दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. अधूनमधून लघवी होणं किंवा खूप कमी प्रमाणात लघवी होणं हे देखील एक गंभीर लक्षण आहे जे आजारांचं लक्षण असू शकतं. आजकाल लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी वेगाने बदलतायत. ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

अयोग्य आहार आणि जीवनशैलीचा विशेषतः महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. महिलांना किडनीशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो. अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे महिलांमध्ये लघवीशी संबंधित समस्या वाढतात. काही प्रमाणात थांबून थांबून लघवी होण्याची समस्या सर्व वयोगटातील महिलांमध्ये उद्भवू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. महिलांमध्ये थांबून थांबून लघवी होणं हे कोणत्या आजारांचं लक्षणं असू शकतं ते पाहूयात.

थांबून-थांबून लघवी होण्याची कारणं

मधुमेहाचं एक लक्षण

मधुमेहामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार झाल्याने तुम्हाला वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते. यावेळी थांबून थांबून लघवी होणं किंवा कमी प्रमाणात लघवी होणं ही समस्या असू शकतं.

यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन (UTI)

कमी प्रमाणात लघवी तयार होणं आणि अधूनमधून लघवी होणं ही समस्या बॅक्टेरियामुळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्या रूग्णांना हा त्रास जाणवू शकतो.

हार्मोन्स बदल

महिलांच्या शरीरात हार्मोन्सची पातळी सतत बदलत असते. रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार देखील होतात. अशावेळी एखाद्या महिलेच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यास थांबून-थांबून लघवी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

किडनी स्टोन

लघवीशी संबंधित समस्या किडनी संबंधित काही समस्यांचं लक्षण देखील असू शकतं. ज्यावेळी किडनीमध्ये खडे तयार होतात तेव्हा त्यामुळे संसर्ग वाढतो. परिणामी थांबून-थांबून लघवी होण्याची समस्या उद्भवू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT