Women Health Tips
Women Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Women Health Tips : वयाच्या 60व्या वर्षीही महिला राहतील तंदुरुस्त, जाणून घ्या 4 हेल्दी टिप्स !

कोमल दामुद्रे

Women Health Tips : पूर्वीच्या काळातील महिला न काही करता ६० वर्षानंतरही तंदुरुस्त असायच्या. परंतु आताच्या बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

त्यामुळे स्त्रिया आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पूर्णपणे औषधांवर अवलंबून असतात. मात्र जास्त औषध घेणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही वयाच्या 60व्या वर्षीही तंदुरुस्त राहू शकता.

महिलांचे (Women) शरीर वाढत्या वयाबरोबर कमजोर होऊ लागते, त्यामुळे महिला अनेक आजारांना बळी पडतात. ज्यात महिलांना अल्झायमर आणि विस्मरणाचा त्रास होतो. WebMD.com वर प्रकाशित केलेले आरोग्यविषियी (Health) सोप्या टीप्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

1. ब्रेन एक्सरसाइज

वयाच्या ६०व्या वर्षी माईंड शार्प ठेवण्यासाठी ब्रेन एक्सरसाइज गरजेचे आहे. तसेच तुमचे माईंड अकॅटिव्ह ठेवण्यासाठी तुम्ही पझल सोडवू शकता. या वयात शक्य तितके आपले मन व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे तुमचे मन व्यस्त ठेवण्यासाठी तुम्ही साहसी गोष्टी करणे, नवीन भाषा शिकणे, नविन छंद जोपासणे या काही गोष्टी करणे गरजेचे असते.

2. व्यायाम

महिलांच्या शरीरातील स्नायू ६० वर्षांनंतर आकुंचन पावतात . त्यामुळे महिलांमध्ये गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी सारखे त्रास उद्धवतात म्हणून हा त्रास टाळण्यासाठी आणि स्नायूंना मजबूत करण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने आजारांचा (Disease) धोका कमी होतो.

3. धूम्रपान करणे टाळा

धूम्रपान करण्याची किंवा तंबाखू खाण्याची सवय काही महिलांना असते, मात्र वयाच्या 60 नंतरही जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर हृदयरोग किंवा कर्करोग या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वयाच्या 60 नंतरही आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर धूम्रपानचे व्यसन पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे.

4. लसीकरण करणे आवश्यक

महिलांमध्ये वयाच्या 60 नंतर प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आरोग्य निरोगी राहण्यााठी मदत मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT