Kidney failure symptoms in women saam tv
लाईफस्टाईल

Changes in women's bodies: किडनी खराब होण्यापूर्वी महिलांचं शरीर देतं 'असे' संकेत; वेळीच जाणून घ्या काय आहेत लक्षणं

Kidney failure symptoms in women: किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतं. पण जर किडनीचे कार्य बिघडले, तर शरीरात अनेक बदल दिसून येतात, जे किडनी फेल्युअरचे (Kidney Failure) संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

किडनीचे आजार बहुतेक वेळा ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखले जातात. कारण सुरुवातीची लक्षणं अगदी सौम्य असतात किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे समजून येत नाहीत. थकवा, शरीर सूजणं, वारंवार लघवी होणं, पायांना सूज येणं ही लक्षणं साधी वाटली तरी ती किडनीच्या बिघाडाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

विशेषतः स्त्रियांमध्ये ही लक्षणं अनेकदा हार्मोन्समधील बदल, लघवीच्या संसर्ग किंवा जीवनशैलीतील कारणांमुळे आहेत असं गृहित धरलं जातं. त्यामुळे तपासणी आणि योग्य उपचार उशिरा होतात.

किडनी आजारांची सामान्य लक्षणं (स्त्री-पुरुष दोघांमध्ये आढळणारी)

सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. रक्त तपासणी, लघवी तपासणी आणि रक्तदाब तपासणीद्वारेच ती समजू लागतात. मधुमेह (डायबिटीज) किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी नियमित तपासणी करणं गरजेचं आहे.

  • पायांना सूज येणं

  • लघवीतून फेस येणं

  • लघवीत रक्त येणं

  • भूक न लागणं

  • थकवा

  • लघवीचं प्रमाण बदलणं

  • कंबरदुखी

  • खाज सुटणं

महिलांमध्ये विशेष दिसणारी किडनी आजारांची लक्षणं

लघवीच्या संसर्गाची शक्यता अधिक

महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होण्याचा धोका जास्त असतो. वारंवार लघवी लागणं, लघवी करताना वेदना होणं ही सामान्य लक्षणं आहेत. संसर्ग किडनीपर्यंत पोहोचल्यास ताप, थंडी वाजणं, पाठीचा त्रास अशी गंभीर लक्षणं दिसतात.

गर्भधारणा

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब आणि पायांना सूज येणं यामुळे किडनीवर ताण येतो. यामुळे भविष्यात उच्च रक्तदाब आणि किडनीचे आजार (CKD) होण्याचा धोका वाढतो. आधीपासून असलेले किडनीचे आजारही गर्भधारणेवर परिणाम करतात.

हार्मोन्समधील बदल

मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या काळात हार्मोन्समध्ये होणारे बदलही किडनीच्या कार्यावर परिणाम करू शकतात. विशेषतः जेव्हा इतर आजार किंवा औषधोपचार सुरू असतात तेव्हा हा धोका अधिक असतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT