Height weight chart: भारतातील व्यक्तींचं उंचीनुसार वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Weight chart for Indian adults: शरीराचे निरोगी वजन राखणे हे एकंदरीत आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जास्त वजन किंवा कमी वजन दोन्हीही अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. व्यक्तीचे योग्य वजन त्याच्या उंचीनुसार आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) नुसार ठरवले जाते.
Height weight chart
Height weight chartsaam tv
Published On
Summary
  • उंची आणि वजनातील समतोल आरोग्यासाठी गरजेचा आहे.

  • BMI हा आरोग्याचा एक सुरुवातीचा मापदंड आहे.

  • BMI 18.5 ते 24.9 पर्यंत योग्य मानला जातो.

उंची आणि वजन यामधील योग्य समतोल फक्त दिसण्यासाठी योग्य नाही तर तो आपल्या संपूर्ण आरोग्याचीही एक मोठी गोष्ट असते. वैद्यकीय क्षेत्रात यासाठी एक महत्वाचं मापदंड वापरलं जातं – BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स. मात्र, तज्ज्ञांच्या मते BMI फक्त एक सुरुवातीचं मापक आहे. हे तुम्हाला पूर्ण चित्र दाखवत नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराचा समतोल अत्यंत गरजेचा आहे. लहान वयात उंची आणि वजन दोन्ही वाढत जातं, पण एक वय झाल्यावर उंची स्थिरावते. त्यानंतर जर वजन अनियंत्रित वाढत गेलं किंवा अचानक कमी झालं, तर ते शरीरातील असंतुलनाचं लक्षण असू शकतं.

BMI म्हणजे नेमकं काय?

BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हे वजन आपल्या उंचीच्या मानाने योग्य आहे का हे पाहण्याचा एक सोपा आणि जागतिक पातळीवर वापरला जाणारा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे-

BMI = वजन (किलो) / उंची² (मीटरमध्ये)

उदाहरणार्थ, एखाद्याचं वजन 70 किलो आहे आणि उंची 6 फूट (1.83 मीटर) आहे, तर

BMI = 70 / (1.83 × 1.83) = 20.90

Height weight chart
Health of IT employees: 84 टक्के IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना होतोय 'हा' गंभीर आजार; केंद्र सरकारकडून गाइडलाइन्स जाहीर

BMI 18.5 ते 24.9 दरम्यान असेल तर ते आरोग्यासाठी योग्य मानलं जातं. 18.5 पेक्षा खाली असलं तर व्यक्ती कमी वजनाची (underweight) आहे आणि 25 पेक्षा जास्त असलं, तर जास्त वजन किंवा स्थूलता (overweight/obesity) मानली जाते.

पण भारतीयांसाठी BMI उपयोगी आहे का?

वजन आणि उंचीच्या बाबतीत भारतीय शरीररचनेचा विषय महत्त्वाचा ठरतो. BMI हा पोटावर साठलेल्या चरबीचं मोजमाप करत नाही आणि हीच चरबी सर्वात धोकादायक मानली जाते. त्यामुळे ICMR म्हणजेच इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने BMI सोबतच कंबरेचं मापन करण्याचाही सल्ला दिला आहे.

Height weight chart
Mangal Gochar: 18 महिन्यांनी मंगळ करणार शुक्राच्या घरात प्रवेश; 'या' राशींचं नशीब चमकणार, आर्थिक प्रगती होणार

पुरुषांची कंबर 90 सेमी पेक्षा जास्त किंवा महिलांची कंबर 80 सेमी पेक्षा जास्त असेल तर BMI नॉर्मल असला तरीही ती स्थूलतेची आणि इतर आरोग्य धोक्यांची पूर्वसूचना असू शकते.

'उंचीप्रमाणे' योग्य वजन किती असावं?

खालील चार्टमध्ये उंचीच्या मानाने स्त्रिया आणि पुरुषांसाठी वजन किती असावं, याचं सामान्य मार्गदर्शक दिलं आहे-

  • 137 सेमी / 4'6" – 28.5 ते 34.9 किलो (स्त्री आणि पुरुष दोघांसाठी)

  • 147 सेमी / 4'10" – 36.4 ते 44.9 किलो (स्त्रिया), 38.5 ते 46.7 किलो (पुरुष)

  • 152 सेमी / 5'0" – 40.8 ते 49.9 किलो (स्त्रिया), 43.1 ते 53.0 किलो (पुरुष)

  • 160 सेमी / 5'3" – 47.2 ते 57.6 किलो (स्त्रिया), 50.8 ते 61.6 किलो (पुरुष)

  • 165 सेमी / 5'5" – 51.2 ते 62.6 किलो (स्त्रिया), 55.3 ते 68.0 किलो (पुरुष)

  • 168 सेमी / 5'6" – 53.0 ते 64.8 किलो (स्त्रिया), 58.0 ते 70.7 किलो (पुरुष)

  • 170 सेमी / 5'7" – 55.3 ते 67.6 किलो (स्त्रिया), 60.3 ते 73.9 किलो (पुरुष)

  • 173 सेमी / 5'8" – 57.1 ते 69.8 किलो (स्त्रिया), 63.0 ते 76.6 किलो (पुरुष)

  • 175 सेमी / 5'9" – 59.4 ते 72.6 किलो (स्त्रिया), 65.3 ते 79.8 किलो (पुरुष)

  • 178 सेमी / 5'10" – 61.2 ते 74.8 किलो (स्त्रिया), 67.6 ते 83.0 किलो (पुरुष)

  • 180 सेमी / 5'11" – 63.5 ते 77.5 किलो (स्त्रिया), 70.3 ते 85.7 किलो (पुरुष)

  • 183 सेमी / 6'0" – 65.3 ते 79.8 किलो (स्त्रिया), 72.6 ते 88.9 किलो (पुरुष)

  • 188 सेमी / 6'2" – 69.4 ते 84.8 किलो (स्त्रिया), 77.5 ते 94.8 किलो (पुरुष)

Height weight chart
Budhwar Upay: गणपती बाप्पाचा एक अचूक मंत्र आणि समस्या होतील दूर; बुधवारच्या दिवशी हे उपाय करायला विसरू नका

ही संख्या एक मार्गदर्शक आहे. मांसपेशींचं प्रमाण, हाडांची घनता, दिनचर्या आणि इतर आरोग्याच्या गोष्टी लक्षात घेऊन यामध्ये काही फरक असू शकतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच योग्य ठरतं.

Q

BMI म्हणजे काय?

A

BMI (बॉडी मास इंडेक्स) म्हणजे वजन आणि उंचीच्या गुणोत्तरावर आधारित शरीराचे आरोग्य तपासण्याचे एक मापदंड आहे.

Q

BMI कसा कॅल्क्युलेट करावा?

A

BMI = वजन (किलोमध्ये) ÷ (उंची मीटरमध्ये)². उदाहरणार्थ, 70 किलो वजन आणि 1.83 मी उंचीसाठी BMI = 70 / (1.83 × 1.83) = 20.90.

Q

सामान्य BMI ची श्रेणी कोणती?

A

उत्तर: 18.5 ते 24.9 पर्यंतचा BMI सामान्य आणि आरोग्यासाठी योग्य मानला जातो.

Q

भारतीयांसाठी BMI पुरेसा आहे का?

A

नाही, BMI पोटावरील चरबीचे मापन करत नाही. त्यामुळे ICMR कंबरेचे मापनही आवश्यक मानते.

Q

कंबरेचे धोकादायक माप किती आहे?

A

पुरुषांची कंबर 90 सेमी आणि महिलांची 80 सेमी पेक्षा जास्त असेल तर ते स्थूलता आणि आरोग्य धोक्याचे संकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com