आजकाल अनेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येतात. काही वेळा वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी मानसिक तणाव वाढतो आणि अनेकदा लोक जुन्या चुका किंवा अनुभवांना दोष देतात. असाच एक अनुभव एका महिलेला आला, जी तीन वर्षांपासून गर्भधारणेचा प्रयत्न करत होती पण प्रत्येक वेळी निराशा पदरी पडत होती. जेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा तिने सांगितलं, “मला वाटलं होतं फरक पडणार नाही… पण...”
या वाक्यानंतर प्रश्न निर्माण झाला की, लग्नाआधीची ती ‘एक गोष्ट’ किंवा ‘चूक’ नेमकी काय होती आणि तीच का गर्भधारणेतील अडथळ्याचे कारण ठरत होती? की यामागे काही वैद्यकीय कारण लपलेलं होतं? या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. महिमा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये डॉ. महिमा यांनी सांगितलं की, त्यांच्या क्लिनिकमध्ये नुकतेच एक 28 वर्षीय जोडपं आलं होतं. जे मागील तीन वर्षांपासून गर्भधारणेचा प्रयत्न करत होतं. अनेक वेळा चाचण्या करूनही गर्भधारणा होत नव्हती.
या महिलेनं लग्नाआधी गर्भपातासाठी गोळी घेतली होती. तिला वाटत होतं की भविष्यात गर्भधारणा सहज होईल, पण तसं झालं नाही. दर महिन्याला गर्भधारणेची चाचणी निगेटिव्ह येत होती आणि त्यासोबत तिचा तणाव आणि नैराश्य वाढत होतं. कुटुंबात कुजबुज सुरू झाली, लोकांच्या प्रश्नांनी आणि टोमण्यांनी ती मानसिकदृष्ट्या खचली. त्यामुळे तिने कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये जाणंही बंद केलं.
हे जोडपं याआधी अनेक डॉक्टरांकडे गेले होते, पण कुठेही समाधानकारक परिणाम मिळाले नाही. डॉ. महिमा यांनी त्यांचे मेडिकल रिपोर्ट तपासणे. महिलेचा एमएच स्तर सामान्य होता, अल्ट्रासाउंड रिपोर्टही ठीक होतं. पतीची सीमेन चाचणीही पूर्णपणे सामान्य होती. तरीही गर्भधारणा होत नव्हती. प्रत्येक वेळी आशा घेऊन चाचणी केली जात होती, पण निराशाच पदरी पडत होती.
महिलेने डॉक्टरांना सांगितलं की, तिच्या डोळ्यांत आणि तोंडात कायम कोरडेपणा जाणवतो. तिला सुमारे सहा वर्षांपूर्वी एक ऑटोइम्यून आजार झाला होता आणि तेव्हापासून लोक म्हणत होते की, ‘तुझ्यासारख्या महिलांना आई होता येत नाही.’ ही गोष्ट तिला आतून पोखरत होती. पण डॉक्टर महिमा यांना माहिती होतं की, प्रत्येक गोष्ट तशी नसते जशी दिसते. तपासणी केल्यानंतर शेवटी त्यांना खरं कारण सापडलं, जे आतापर्यंत सर्वांच्या नजरेपासून लपलेले होते.
तपासणीत स्पष्ट झालं की, या महिलेला Sjögren’s सिंड्रोम आहे. हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर असून यामध्ये डोळे, त्वचा आणि योनीमध्येही कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणं कठीण होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.