Physical Relation Saam Tv
लाईफस्टाईल

Physical Relation: वेळीच थांबा ! संसर्गामुळे महिलेला गमवावे लागले हात-पाय; तुम्ही देखील लैंगिक संबंध ठेवताना 'ही' चुक करताय?

काही आजार असे देखील आहे ज्याची सुरुवातीला कोणतेही लक्षण दिसत नाही.

कोमल दामुद्रे

Physical Relation : काही आजार हे सामान्य असतात तर काहीची लक्षणे ही स्पष्टपणे दिसून येतात. परंतु, काही आजार असे देखील आहे ज्याची सुरुवातीला कोणतेही लक्षण दिसत नाही. त्यामुळे हे आजार (Disease) हळूहळू गंभीर स्वरूप धारण करतात आणि त्यामुळे अनेक वेळा माणसाला शरीराचे अवयवही गमवावे लागतात.

आज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिच्यासोबत असेच काहीसे घडले आहे. चला जाणून घेऊया या महिलेचे काय झाले ते (Latest Marathi News)

2017 मध्ये यूकेमध्ये राहणाऱ्या महिलेला सेप्सिस झाला होता, ज्यामुळे तिला तिच्या शरीराचे चार भाग गमवावे लागले होते. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेचे (Women) दुहेरी हात प्रत्यारोपण केले. किमला कदाचित स्वप्नातही वाटले नसेल की किरकोळ संसर्गामुळे तिची अशी अवस्था होईल व हातपाय गमावण्याची वेळ येईल.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात स्पेनमधून झाली. काही वर्षांपूर्वी ती महिला स्पेनला सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. जिथे त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शननंतर सेप्सिसच्या समस्येला सामोरे जावे लागले.

साऊथ वेस्ट न्यूज सर्व्हिस (SWNS) च्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी किमला 9 महिन्यांसाठी तात्पुरत्या कोमात ठेवले होते. यूटीआयनंतर तिच्या शरीरात सेप्सिस पसरल्याने तिचे पाय आणि हात गमवावे लागले.

या सर्व समस्यांपूर्वी ती हेअर ड्रेसर म्हणून काम करायची. चारही अवयव निकामी झाल्यानंतर तिला दुहेरी हात प्रत्यारोपणासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. ही संपूर्ण दुहेरी हात प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या काही रुग्णालयांपैकी लीड्स जनरल इन्फर्मरी हे एक आहे.

SWNS शी बोलताना तिने सांगितले की, माझे अवयव विच्छेदन निश्चित आहे. जेव्हा डॉक्टर माझ्याशी याबद्दल बोलले, तेव्हा मी फक्त 'होय, ठीक आहे' असे म्हणाले. तिने असे ही सांगितले की, माझे हे अवयव पूर्णपणे खराब झाले आहेत आणि आता काहीही करता येणार नाही. मला असे वाटते की, दुहेरी हात प्रत्यारोपणानंतर, मी माझी काम करण्यास सक्षम होईल.

CDC (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) नुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 17 लाख लोक सेप्सिसने प्रभावित होतात. शरीरात संसर्ग झाल्यामुळे सेप्सिस सुरू होतो. हळूहळू जेव्हा हा सेप्सिस शरीरात वाढू लागतो तेव्हा त्याचे स्वरुप अधिक गंभीर होऊ लागतात.

यामुळे अवयव निकामी होतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. फुफ्फुस, मूत्रमार्ग, त्वचा आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या संसर्गामुळे सेप्सिसचा धोका जास्त असतो. या सर्व संक्रमणांवर वेळेवर उपचार न केल्यास, सेप्सिस आपल्या शरीरात वेगाने पसरण्यास सुरुवात होते ज्यामुळे ऊतींचे नुकसान, अवयव निकामी होणे आणि मृत्यू होऊ शकतो.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या मते, सेप्सिस प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होतात. घट्ट कपडे घालणे, बाथरूमच्या वाईट सवयी, सेक्स नंतरच्या सवयी आणि डिहायड्रेशन यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाची समस्या उद्भवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Business Ideas For Women: 12 वी पास महिलांसाठी कामाची संधी, हे 5 बिझनेस लवकरात लवकर सुरू करा

ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत तणाव? भाजपचा जरांगेंआडून शिंदेंना संपवण्याचं कट? फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कुणाची ताकद?

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पैशांचा सुळसुळाट, मतदारांना 10 हजार वाटल्याचा विरोधकांचा आरोप

फटाके बनवत असताना भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT