Teenager adult movie addiction : Adult movie मुळे किशोरवयीन मुलांवर काय परिणाम होतो?

युटूब किंवा Adult movie च्या साइट्सवरुन मुलांना याबद्दल जाणून घेण्याची अधिक उत्सुकता असते पण खरेच मुले त्याबद्दल जागरुक असतात का ?
Teenager adult movie addiction
Teenager adult movie addictionSaam Tv
Published On

Teenager adult movie addiction : आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाविषयी फारसे उघडपणे बोले जात नाही. पण सध्या लैंगिक शिक्षण ही काळाची गरज बनली असून किशोरवयीन अवस्थेतील मुलांना याबद्दल सांगणे गरजेचे आहे. मुलांना योग्य वयात या गोष्टींबद्दल माहिती न दिल्यास त्यांच्या मनावर चुकीचा परिणाम होतो.

हल्ली बदलेली जीवनशैली व वाढत्या वयानुसार किशोरवयीन मुलांकडे फोन सहज उपलब्ध असतो. चित्रपटात किंवा स्क्रिनच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांना लैंगिकतेचे आकर्षण सहज होते. युटूब किंवा Adult movie च्या साइट्सवरुन मुलांना याबद्दल जाणून घेण्याची अधिक उत्सुकता असते पण खरेच मुले त्याबद्दल जागरुक असतात का ? वास्तविक जगात असणारे लैंगिक जीवन व काल्पनिक जगात रममाण होणाऱ्या लैंगिक संबंधांचा किशोरवयीन अवस्थेतील मुलांवर (Child) कसा परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Teenager adult movie addiction
Physical Relation : लैंगिक संबंधासाठी सकाळची वेळ योग्य की, अयोग्य ?

Adult movieच्या विळख्यात अडकलेले किशोरवयीन अवस्थतेतील मुलांचे मन व विचार करण्याती क्षमता ही अधिक बदलत जाते. याचा सर्वात जास्त परिणाम हा तरुण मनावर होतो. कारण एकदा का Adult movie बघायला लागले की, ते सतत त्यांना पाहावेसे वाटते कारण, त्यांना नेहमी लैंगिकतेमध्ये होणारी गुपिते जाणून घ्यायचे असते व प्रौढ वर्ग हे त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असतो.

तसेच Adult movie पाहणाऱ्या तरुणांच्या मनाची वाढ देखील खुंटत आहे. जेव्हा त्यांचे वय काही शिकण्याचे असते किंवा काही करुन दाखवण्याचे असते तेव्हा अशावेळी ते लैंगिक संबंध किंवा Adult movieच्या विळाख्यात अडकतात व आपल्या ध्येयापासून दूर जातात.

Teenager adult movie addiction
Mistakes That are Killing Your Physical Relationship : 'या' चुकांमुळे तुमच्या नात्यात येईल तणाव, तुम्ही देखील असे करत नाही ना !

एकदा का तरुणांना Adult movie पाहण्याची सवय लागली की, तरुणांच्या मेंदूला त्या विचारांतून बाहेर पडणे फार कठीण जाते. कारण, त्यांना त्या गोष्टी करण्याची इच्छा सतत होऊ लागते. तसेच त्यांचे मन हे लैंगिक संबंधाचा पाठलाग करू लागतात जे शेवटी व्यसन बनते. त्यामुळे ते करियरमध्ये (Career) अपयशी ठरतात व त्यांचे मनही विचलित होते. यामुळे त्यांच्या नात्यावर देखील परिणाम होतो.

तसेच अतिशय दु:खद व सत्य गोष्ट म्हणजे लाखो तरुण दररोज फक्त अश्लील बघण्यासाठी इंटरनेट वापर करत आहेत. ज्याचा वापर सध्या ज्ञान घेण्यासाठी केला जात नाही. ज्यामुळे त्यांचा करिअरवर देखील परिणाम होत आहे. अश्लील बघून कुठेतरी तरुण मन हे बलात्कार, मानसिक आरोग्य समस्या, रोग असुरक्षित लैंगिक संबंध, तरुण वयात गर्भवती होणे यांसारखा परिणाम त्यांच्यावर होत आहे आणि कदाचित त्यामुळेच भारत आणि इतर अनेक देशांमध्ये अशा साइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, अजून या गोष्टी बेकायदेशीरपणे पाहिल्या जात आहे व त्याचा परिणाम देखील आपल्याला दिसून येत आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com