Pav Bhaji Without Tomato SAAM TV
लाईफस्टाईल

Pav Bhaji Without Tomato : टोमॅटो महागले, तरी पावसाळ्यात बनवा चटपटीत पावभाजी! वापरा 'ही' भन्नाट युक्ती

Pav Bhaji Recipe : पावसाळ्यात टोमॅटो महागले असताना देखील तुम्ही टोमॅटोचा वापर न करता चटपटीत पावभाजी बनवू शकता. सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या टोमॅटोचे भाव वाढले आहेत. अशात सर्वसामान्यांना जेवण बनवताना टोमॅटोची कमतरता भासत आहे. पावसाळ्यात अनेकांना चटपटीत खाण्याचा मोह होतो. अशात आपण जर पावभाजीचा बेत आखला. तर 'टोमॅटो शिवाय पावभाजी कशी करायची?' असा प्रश्न पडतो. पण आता महागाईची झळ जिभेची चव पुरवताना आड येणार नाही. तुम्ही टोमॅटोशिवाय चटपटीत पावभाजी बनवू शकता.

टोमॅटोची आंबट चव पावभाजीचा स्वाद वाढवते. टोमॅटो शिवाय हा स्वाद आपण पावभाजीला आणू शकतो. यासाठी तुम्हाला टोमॅटो ऐवजी बीटरुटचा वापर करावा लागेल.

टोमॅटो शिवाय 'अशी' बनवा पावभाजी

साहित्य

  • भाजी : कांदा, फ्लॉवर ,बटाटा, वाटाणे, शिमला मिरची

  • मसाला : आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, कोथिंबीर, मीठ, आमचूर पावडर

  • बीट

  • तूप

  • लिंबू

  • दही

कृती

पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम शिमला मिरची, बीट, फ्लॉवर आणि बटाटा बारीक कापून घ्या. हिरव्या वाटाण्यांसोबत कुकरला या भाज्या उकडून घ्या. भाज्या उकडताना मीठ घालायला विसरू नका. तुमच्या आवडीनुसार यात इतर भाज्या देखील तु्म्ही टाकू शकता. उकडलेल्या भाज्या थंड झाल्यावर बारीक मॅश करून घ्या. आता दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन फ्राय होईपर्यंत छान मिक्स करून घ्या. या मिश्रणात ‌आलं-लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ, आमचूर पावडर , लिंबू आणि दही घालून सर्व मिक्स करून घ्या. लिंबू आणि दहीमुळे पावभाजीची चव आणखी वाढेल. तसेच बीटमुळे पावभाजीला चांगला रंग येईल. मसाल्यांना छान तेल सुटल्यावर त्यात सर्व भाज्या टाकून पाणी घालून छान उकळी येऊ द्या. सर्वात शेवटी कोथिंबीर घाला. पावसात गरमागरम पावभाजीचा आस्वाद घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT