हिवाळ्यात बाजारात आपल्याला बीटरुट आणि गाजर पाहायला मिळतात. बीटरुट-गाजर सुपरफूड म्हटलं जाते. रोजच्या आहारात सलाड, कोशिंबीर या स्वरुपात बीट आणि गाजरचा आपल्या आहारात समावेश असायला हवा. पण तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नवीन रेसिपी ट्राय करु शकता.
1. साहित्य
500 ग्रॅम किसलेले गाजर
500 ग्रॅम किसलेले बीटरूट
एक कप दूध (Milk)
अर्धा कप चांगली पावडर
१/४ कप देशी तूप
बारीक चिरलेला काजू
2. कृती
सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवून त्यात किसलेले बीटरूट आणि गाजर घाला.
८ ते १० मिनिटे रंगबदेलपर्यंत चांगले शिजवून घ्या.
त्यात एक कप दूध घालून त्यात गाजर आणि बीटरुट शिजवून घ्या.
दूध पूर्णपणे आटोस्तोवर शिजवून घ्या.
सतत ढवळत राहा ज्यामुळे तव्याच्या तळाला चिकटणार नाही. त्यात गूळ पावडर घाला. त्यानंतर त्यात तूप घाला.
मिश्रण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत ढवळत राहा. त्यात वरुन काजू, बेदाणे, पिस्ते घाला.
गरमागरम सर्व्ह करा गाजर-बीटरुटचा हलवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.