Beetroot Pickle Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Beetroot Pickle Recipe : हिवाळ्यात ट्राय करा चटपटीत बीटाचे लोणचे, घरच्या घरी बनवा; पाहा रेसिपी

Winter Special Recipe : ताटाची डावी बाजू अधिक टेस्टी बनवण्यासाठी आपण लोणचे वाढतो. लोणच्याचे नाव काढताच आपल्याला सगळ्यात आधी आठवण येते ती आई आणि आजीच्या हाताच्या लोणच्याची.

कोमल दामुद्रे

How To Make Beetroot Pickle :

ताटाची डावी बाजू अधिक टेस्टी बनवण्यासाठी आपण लोणचे वाढतो. लोणच्याचे नाव काढताच आपल्याला सगळ्यात आधी आठवण येते ती आई आणि आजीच्या हाताच्या लोणच्याची.

बाजारात हल्ली डबा बंद लोणची मिळतात. पण हिवाळ्यात आपल्या बीटरुट सर्वत्र पाहायला मिळतात. बीटरुटचा वापर पराठा किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी अनेकवेळा ट्राय केला जातो. पण आपण या बीटरुटपासून चविष्ट असे लोणचे ट्राय करु शकतो पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • २ कप बीटरूट

  • ८ पाकळ्या लसूण

  • २देठ कढीपत्ता

  • १ इंच आले

  • ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • १ चमचा हळद (Turmeric)

  • २ चमचे काश्मिरी लाल मिरची

  • २ चमचे मेथीदाणे

  • २ तिखट

  • अर्धा चमचा हिंग

  • ३ चमचे कोरड्या कैरीची पावडर

  • २ चमचे लोणचे मसाला

  • २ चमचे मोहरी

  • २ टीस्पून व्हिनेगर

  • चवीनुसार मीठ

  • २ कप मोहरीचे तेल (Oil)

2. कृती

  • बीटरूटचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम बीटरूट धुवून त्याची साल काढून घ्या.

  • बीटाचे लहान आकारात तुकडे करा. बीटरु मलमलच्या कपड्यावर ठेवा. २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात राहू द्या.

  • यानंतर त्यात किसलेले आले आणि हिरवी मिरची बारीक करुन घ्या.

  • त्यानंतर कढईत २ कप मोहरीचे तेल गरम करुन घ्या. मोहरीचे तेल गरम झाल्यावर मोहरी टाका. त्यात कढीपत्ता, आले आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. हळद आणि काश्मिरी तिखट घालून मिक्स करा.

  • १५ मिनिटांनंकर या मिश्रणात वाळवलेले बीटरुट घालून झाकण ठेवा. २० ते २५ मिनिटे शिजवून घ्या.

  • दुसऱ्या तव्यावर मेथीचे दाणे, बडीशेप, ओवा, धणे चांगले भाजून घ्या. मसाले थंड होण्यासाठी प्लेटमध्ये ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यामध्ये मीठ, लोणचे मसाला आणि कैरी पावडर घालून मिक्स करा.

  • वरील सर्व साहित्याला मिक्सरमध्ये वाटून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये १ कप मोहरीचे तेल गरम करा. तयार लोणचे थंड करुन बरणीत टाकल्यावर गरम तेल टाका. त्यानंतर लोणचे ४ ते ५ दिवस पुन्हा उन्हात ठेवा. तयार आहे चटपटीत बीटरुटचे लोणचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

SCROLL FOR NEXT