Winter Care Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Care : हिवाळ्यात फेस वॉश केल्यानंतर वापरा 'या' गोष्टी, त्वचेवर येईल जबरदस्त ग्लो

सध्या वाढत्या प्रदूषण व ऋतूनुसार आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Winter Care : चेहऱ्याची सुंदरता हल्ली प्रत्येकालाच प्रिय असते. त्यासाठी आपण चेहऱ्यावर विविध रासायनिक घटकांचा वापर करत असतो. चेहरा अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण दिवसेंदिवस त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करतो.

सध्या वाढते प्रदूषण (Pollution) व ऋतूनुसार आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात तापमानामुळे त्वचा अधिक कोरडी होते. या काळात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचा अधिक कोरडी होईल, ज्यामुळे रॅशेस आणि खाज येण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. काही खबरदारी घेतल्यास हिवाळ्यातही तुम्ही तुमची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनवू शकता.

हिवाळ्यात त्वचेचा (Skin) ओलावा लवकर कमी होतो. अशा परिस्थितीत, चेहरा धुतल्यानंतर, त्वचा कोरडी होऊ नये म्हणून ते योग्यरित्या मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया की, हिवाळ्यात फेस वॉश केल्यानंतर खोबरेल तेल व्यतिरिक्त कोणत्या 4 गोष्टी वापरल्याने त्वचा अधिक चमकदार होते.

फेस वॉश केल्यावर या गोष्टींनी त्वचा चमकदार होईल

हेल्थलाइननुसार त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. चमकदार त्वचा हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. म्हणजेच त्वचेचा रंग कोणताही असो, पण त्वचेवर चमक असेल तर ती चांगली मानली जाते. हिवाळ्यात फेस वॉश केल्यानंतर खोबरेल तेलाचा वापर फायदेशीर मानला जातो. यासोबतच, चमकदार त्वचेसाठी तुम्ही या गोष्टी वापरू शकता

1. ऑलिव्ह ऑईल-

हिवाळ्यात ऑलिव्ह ऑईल चेहऱ्यावर वापरता येते. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते, जी चमकणाऱ्या त्वचेसाठी प्रभावी आहे. एक चमचा ऑलिव्ह ऑईल चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज केल्यास फायदा होतो.

2. कोरफड आणि मध-

कोरफड आणि मध एकत्र करून त्याचा वापर करणे त्वचेसाठी खूप आरोग्यदायी मानले जाते. यामुळे हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन चेहऱ्यावर चमक येते. यामुळे त्वचाही मुलायम होते.

dry skin

3. व्हिटॅमिन ई तेल-

हिवाळ्यात तुमची त्वचा सुधारण्यासाठी आणि मऊ करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई तेल देखील वापरू शकता. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचेचा पोतही सुधारतो. रोज फेस वॉश केल्यानंतर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई तेल लावणे फायदेशीर ठरते.

4. बदामाचे तेल-

बदामाच्या तेलात असे अनेक गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहरा चमकदार होतो. फेस वॉश केल्यानंतर बदामाचे तेलही वापरता येते. रात्री फेस वॉश केल्यानंतर ते लावल्याने अधिक फायदे मिळू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT