Hair Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीच्या समस्येने त्रस्त, चेहऱ्यावर सतत डाग येताय? आवळ्याचा असा करा वापर

Amla Oil Benefits : आवळ्यामध्ये अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतात.

कोमल दामुद्रे

Amla Benefits :

हिवाळ्यात वातावरणात गारवा अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या काळात केसगळती, केस कमकुवत आणि पांढऱ्या केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

या समस्यांवर बहुगुणी ठरतो आवळा. यामध्ये अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतात. आवळा हा केसांसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याची चव तुरट जरी असली तरी त्याचे तेल केसांसाठी चांगले आहे. तसेच या तेलाचा वापर त्वचेसाठी केल्यास कोरडी त्वचा आणि डाग निघून जाण्यास मदत होईल. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा ते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आवाळ्याचे तेल कसे बनवायचे?

तेल बनवण्यासाठी ५ ते ६ आवळा, १ कप खोबऱ्याचे तेल लागेल

2. कृती

  • हे तेल (Oil) बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळा धुवून घ्या. ५ ते १० मिनिटे पाण्यात उकळवून घ्या.

  • आवळा उकळल्यानंतर तो मऊ होईल. त्याच्या बिया काढून त्याला चांगले मॅश करा.

  • मॅश केल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन त्याचा रस काढा. रस गाळून त्याचा लगदा वेगळा होईल.

  • दुसऱ्या भांड्यात खोबऱ्याचे तेल गरम करुन नंतर त्यात आवळ्याचा रस मिसळा.

  • हे मिश्रण पाच मिनिटे शिजवून घ्या. कोमट झाल्यानंतर डोक्याला मसाज करा आणि तासाभरानंतर केस धुवा.

3. आवळ्याचे तेल लावण्याचे फायदे

  • हिवाळ्यात (Winter Season) त्वचेसोबत टाळूमध्ये कोरडेपणा वाढतो, त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळू लागतात, त्यामुळे आवळा तेल लावल्याने ही समस्या दूर होईल.

  • केस धुण्यापूर्वी किमान तासभर लावा नंतर शाम्पूने केस धुवा

  • केसांव्यतिरिक्त हे तेल तुम्ही चेहऱ्यावरही लावू शकता. हे तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतील. तसेच चेहरा उजळण्यास मदत होईल.

  • हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आवळा तेलाचाही वापर करु शकता.

  • चेहऱ्यावरील (Skin) डाग त्वचेचे सौंदर्य हिरावून घेते. त्यासाठी आवळा तेल फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT