Winter Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Health Tips: हिवाळ्यात फिट अन् फाइन राहायचं? 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

Health Tips: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचे असते. या हंगामात निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून बचाव करायचा असेल तर तुमच्या आहारात बदल केले पाहिजे.

Bharat Jadhav

Healthy food In winter :

हिवाळा सुरू झाला की, त्यानुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे. आपण आपल्या शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यास मदत करतो. पण ऋतूनुसार आहारात बदल करणं आवश्यक असते. ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हा बदल आवश्यक असतो. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे आजार होत असतात. ज्यामध्ये ताप, घशातील संसर्ग आणि अगदी फुफ्फुसाचा संसर्गदेखील या काळात होत असतो. त्यामुळे आहारात बदल करुन आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. (Latest News)

हिरव्या भाज्या

हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचं सेवन करावं. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड्स, बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हिवाळ्याच्या संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात. पालक आणि कोबी इत्यादी हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या भाज्या हे आरोग्यासाठी चांगल्या आहेत.

हिरवा भाजीपाला

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक विशेष पोषक तत्वांची आवश्यकता असते. हे पोषक तत्व या लिंबूवर्गीय फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हिवाळ्यात संत्रीचं सेवन करावं. रोज एक संत्री किंवा इतर कोणतेही लिंबूवर्गीय फळ खाल्ल्यास प्रतिकारशक्ती मजबूत करता येते.

सुका मेवा

आपली प्रतिकारशक्ती चांगली करायची असेल तर सुक्या मेव्याचे सेवन देखील करू शकता. प्रथिने, पोटॅशियम आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक घटक बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांमध्ये आढळतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुग्धजन्य पदार्थ

शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. तसेच, प्रोबायोटिक्स इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती वेगाने मजबूत करण्यास मदत करतात.

संपूर्ण धान्य

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अजून मार्ग म्हणजे आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश करणे. जर तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश केला तर ते तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यातून आपल्याला मॅग्नेशियम, लोह आणि जस्त, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्व मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sooryavansham : 'सूर्यवंशम' मधील हीरा ठाकुरचा मुलगा आता कसा दिसतोय? इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव, पाहा फोटो

Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

LPG Cylinder Price: तुमच्या शहरात LPG गॅस सिलिंडरची किंमत किती? बुकिंग करण्याआधी दर जाणून घ्याच

Accident News : ४० हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT