Winter Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Health Tips : सर्दी-खोकल्यात चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, घश्याला आणखी त्रास होण्याची शक्यता

गुलाबी थंडी व वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक संसर्गजन्य आजारांशी लढता येत नाही.

कोमल दामुद्रे

Winter Health Tips : हिवाळा सुरु झाला की, अनेक आजार होण्याची शक्यता अधिक असते. गुलाबी थंडी व वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक संसर्गजन्य आजारांशी लढता येत नाही. तसेच खाण्यापिण्यातील बदलांमुळे देखील आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे आपल्याला सर्दी-खोकल्यासारखे आजार होऊ लागतात.

सर्दी - खोकल्याच्या या आजारात व्हायरसशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. व्हायरसशी लढण्यासाठी औषधे कमी प्रभावी आहेत, त्यामुळे या समस्यांशी लढण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब केला जातो. सर्दी-खोकला टाळण्यासाठी अनेकदा आपण उपाय करत राहतो. पण आपण कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याचे भान ठेवता येत नाही. हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत, ज्यामुळे सर्दी व खोकला होण्याची संभाव्यता अधिक असते.

ताप आणि खोकल्यामध्ये या फळांचे सेवन करू नका

1.स्ट्रॉबेरी (Strawberry)

Strawberry

स्ट्रॉबेरीला सुपरफूड म्हटले जात असले तरी, स्ट्रॉबेरीचे जास्त सेवन केल्याने शरीरात हिस्टामाइन नावाचे संयुग बाहेर पडते ज्यामुळे असामान्य रक्त गोठू शकते. यामुळे, छातीत जमा झालेल्या श्लेष्मामुळे नाक आणि सायनसच्या भागात समस्या वाढू शकतात. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास अजिबात खाऊ नका.

2. लिंबूवर्गीय फळे(Citrus Fruits)

Citrus Fruits

सर्दी आणि खोकल्यामध्ये लिंबूवर्गीय फळे खाऊ नयेत, म्हणजे सायट्रिक ऍसिड असलेल्या फळांमुळे ऍसिड रिफ्लेक्स होऊ शकते ज्यामुळे तुमच्या घशातील समस्या वाढते आणि खोकला सुरू होतो. अशा स्थितीत घसा खवखवणे, दुखणे आणि खोकला वाढतो. या ऐवजी तुम्ही अननस, नासपती आणि टरबूज यासारखी फळे खाऊ शकता.

3. पपई (Papaya)

Papaya

पपई हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ मानले जाते. पण खोकला आणि सर्दीचा त्रास असेल तर ते टाळावे. पपईतून निघणारे हिस्टामाइन घटक आपल्या छातीमध्ये जळजळ होण्याची समस्या वाढवतात. यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सायनस जाईपर्यंत पपई खाऊ नका.

4. केळी (Banana)

Banana

शरीराला झटपट ऊर्जा देणारे केळे सर्दी-फ्लूमध्येही समस्या वाढवण्याचे काम करते. केळी हे साखरेचे उच्च प्रमाण असलेले अन्न आहे ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते, याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केळीमध्ये सर्दीचा प्रभाव असतो, त्यामुळे सर्दी-फ्लूमध्ये ते खाऊ नये.

5. पेरू (Guava)

Guava

सर्दी, खोकला झाल्यास पेरूचे सेवन अजिबात करू नका. हे फळ अतिशय थंड असल्यामुळे आपली समस्या आणखी वाढू शकते. यासाठी रात्री पेरू खाणे टाळा, कारण यावेळी थंडीचा प्रभाव अधिक असतो. यामुळे आरोग्य बिघडू शकते.

6. चहा-कॉफी (Tea- Coffee)

Tea- Coffee

ताप आणि खोकल्यामध्ये अनेकदा लोकांना चहा-कॉफी प्यायला आवडते. पण सर्दी-फ्लूमध्ये या गोष्टी खूप हानिकारक ठरू शकतात. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या शरीराचे निर्जलीकरण करते. शरीरात कॅफिन प्रवेश करताच आपण वारंवार लघवी करू लागतो आणि शरीरात पाण्याची (Water) कमतरता असल्याने शरीर निर्जलीकरण होते. यामुळे स्नायूंमध्ये वेदना वाढतील आणि उलट्या आणि जुलाबाची समस्या देखील होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT