Ginger Garlic Soup Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Ginger Garlic Soup Recipe: हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम, ट्राय करा आलं-लसणाचे सूप; पाहा रेसिपी

Immunity Booster Soup : बदल्या हवामानात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. वातावरणातील गारव्यामुळे मुलांना सर्दी, खोकला यांचा अधिक त्रास होतो. जर तुम्हाला देखील सर्दी खोकला यापासून आराम मिळवायचा असेल तर आलं लसणाचे सूप ट्राय करा.

कोमल दामुद्रे

How To Make Ginger Garlic Soup :

बदल्या हवामानात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. वातावरणातील गारव्यामुळे मुलांना सर्दी, खोकला यांचा अधिक त्रास होतो. जर तुम्हाला देखील सर्दी खोकला यापासून आराम मिळवायचा असेल तर आलं लसणाचे सूप ट्राय करा.

आले लसूण (Garlic) केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण आहे. जे सर्दी, खोकला सारख्या ससंर्गजन्य आजारांपासून बचाव करतात. हे सूप बनवायचे कसे पाहूया रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • २ चमचे आले-लसूण बारीक चिरलेले

  • २ चमचे गाजराचे बारीक तुकडे

  • २ चमचे हिरवा वाटाणा

  • २ चमचे मक्याचे दाणे

  • २-३ चमचे बारीक चिरलेला कोबी

  • १ चमचा तेल (Oil)

  • चवीपुरते मीठ

  • १ चमचा कॉर्न फ्लॉवर

  • १ चमचा ठेचलेला लसूण

2. कृती

  • सूप बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. नंतर त्यात आलं आणि लसूण टाका.

  • नंतर त्यात गाजर, वाटाणा, मक्याचे दाणे, कोबी टाका.

  • त्यात पाणी आणि मीठ घाला आणि वरुन ठेचलेला लसूण टाका.

  • हे मिश्रण भाज्या शिजेपर्यंत चांगले उकळून घ्या.

  • त्यात कॉर्न फ्लॉवर टाका आणि गरमा गरम सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT