Calcium Deficiency Saam tv
लाईफस्टाईल

Calcium Deficiency : हाडे ठिसूळ झालीये, दातांचे दुखणेही वाढले? असू शकते कॅल्शियमची कमतरता, ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा

कोमल दामुद्रे

Calcium Deficiency Symptoms :

शरीराला निरोगी राहाण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. हे पोषक घटक तुमच्या शरीराच्या सर्वांगीण आणि योग्य विकासासाठी मदत करतात. कॅल्शियम हे या पोषक तत्वांपैकी एक आहे जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हिवाळा सुरु झाला की, हाडे दुखी आणि दाताचे दुखणे सुरु होते. अशावेळी नेमके काय करावे हे आपल्या सुचत नाही. जेव्हा ही समस्या अचानक उद्भवते तेव्हा साधरणत: समजून घ्यावे की, शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी याची कमतरता ओळखणे गरजेचे आहे. शरीरात कॅल्शियमच्या कमरतेमुळे दिसणाऱ्या लक्षणांकडे (Symptoms) दुर्लक्ष करु नका. ही लक्षणे कोणती जाणून घेऊया

1. स्नायू दुखणे

अचानक स्नायू दुखू लागले की कॅल्शियमची कमरता आहे हे समजून घ्यावे. यामुळे पाय, पाठ आणि हात दुखू लागतात. अशावेळी डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घ्यावा

2. दात किडणे

दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम (calcium deficiency) अधिक आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.

3. ऑस्टिओपोरोसिस

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास कमतरतेमुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतात.

4. मुलांची वाढ खुंटते

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यांची वाढ आणि विकास विलंब होऊ शकतो. कारण चांगल्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे.

5. हातापायांना मुंग्या येणे

अनेकदा हात, पाय, बोटे आणि चेहऱ्यावर सुन्नपणा आणि मुंग्या जाणवत असेल तर कॅल्शियमची कमतरता आहे असे समजून घ्यावे. यासाठी आहारात बदल करावा. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT