Baby Care Tips
Baby Care Tips Saam tv
लाईफस्टाईल

Baby Care Tips : कडाक्याच्या थंडीत नवजात बाळाचे कसे कराल संरक्षण, डॉक्टरांनी दिल्या खास टिप्स

कोमल दामुद्रे

Parenting Tips :

हिवाळ्याच्या दिवसात थंड वातावरण लहान बाळासाठी त्रासदायक ठरु शकते. या ऋतूमध्ये हानिकारक जीवाणू आणि विषाणू खूप वेगाने वाढतात आणि नवजात बाळासाठी त्रासदायक ठरतात.

मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने, निष्काळजीपणामुळे मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. या हंगामात आपल्या लहान मुलाचे (Child) सर्दीपासून संरक्षण कसे कराल यासाठी याठिकाणी खास टिप्स देण्यात आल्या आहेत.

पुण्यातील अंकुरा हॉस्टिपटल्सचे निओनॅटोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ मदभुशी म्हणतात की, हिवाळ्यात तापमान कमी-जास्त होत असते. या दिवसात नवजात शिशुंना सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना हिवाळा आणि थंड हवामानाच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी खाली दिलेल्या बाबींचे पालन करा.

1. बाळाला उबदार कपडे घाला:

मुलांचे थंडीपासून (Winter Season) संरक्षण करण्यासाठी आपल्या बाळाला (Baby) फुल कपडे घाला, आणि कॉटनच्या दुपट्यात व्यवस्थित गुंडाळा. शिवाय बाळाच्या हाता आणि पायासाठी लोकरीचे मोजे घेऊन या. त्याचे कानही झाकून ठेवा.

2. जड ब्लँकेट वापरू नका:

पातळ घोंगडी अनेकदा तुमच्या बाळासाठी उब टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी असते. थंडीच्या महिन्यांत तुमच्या बाळासाठी जाड आवरणाने झाकु नका कारण त्याच्या वजनामुळे बाळ झोपत असताना त्यांच्या हात आणि पायांच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात आणि उष्णता वाढु शकते, तसेच ते चेहऱ्यावर ओढू शकतात, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, पातळ ब्लँकेटची निवड करा आणि खोलीचे तापमान नियंत्रित राखा.

3. पोट आणि बोटांच्या तापमानाची तुलना करा :

कपड्यांच्या थरांमुळे तुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान खूप थंड किंवा खूप गरम नसल्याची खात्री करा. तुमच्या बाळाला स्पर्श करायला थंड वाटत असल्यास, कपड्यांचा आणखी एक थर घालून त्याला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. पोट आणि पायाची बोटे यांची तुलना करणे महत्त्वाचे आहे.

4. सर्दीपासून रक्षण

सामान्य सर्दीपासून नवजात बालकांचे संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जंतूमुक्त वातावरण राखणे. जे आजारी आहेत त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण सामान्य सर्दी, जरी सामान्यतः मोठ्या मुलांमध्ये सौम्य असली तरी, लहान मुलांमध्ये ब्रॉन्कायलाइटिस किंवा न्यूमोनिया सारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकते. तुमच्या मुलाला सर्दी होण्यापासून रोखण्यासाठी या काही सोप्या टिप्स नक्की पालन करा.

स्तनपानाचाही सल्ला दिला जातो कारण ते तुमच्या नवजात शिशुला आईच्या दुधात असलेल्या ऍन्टीबॉडीजमुळे होणारे संक्रमण रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी मदत देते. बाळाला हाताळताना वारंवार हात धुणे गरजेचे आहे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीची ठिकाणे टाळल्याने खोकला आणि शिंका येणे कमी होऊ शकते. तुमच्या नवजात शिशूशी संवाद साधणाऱ्या सर्व प्रौढ व्यक्तींना आणि मुलांमध्ये पेर्तुसिस (डांग्या खोकला), फ्लू आणि कोविड १९ लसीकरण झाल्याची खात्री करा.हिवाळ्यात बाळाची त्वचा कोरडी पडते त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण शरीरावर मॉइश्चरायझरचा वापर करा.

5. ह्युमिडिफायर वापरा

जर बाळाला सर्दी झाली असेल, तर कूल-मिस्ट ह्युमिडिफायर हवेत ओलावा वाढवून नाक चोंदणे सारख्या समस्येपासून दूर ठेवते. कारण ते हवेत आर्द्रता वाढवतात, ज्यामुळे बाळाचे नाक कोरडे होण्यापासून रोखता येते. तुम्ही बाळाच्या खोलीत बिछान्याजवळ, पाळणाजवळ ह्युमिडिफायर ठेवू शकता. परंतु बाळ त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची विशेष काळजी घ्या. आतमध्ये बॅक्टेरिया किंवा धूळ साचू नये म्हणून ते नियमितपणे स्वच्छ आणि कोरडे करण्याची खात्री करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lychee Side Effects: मधुमेह असणाऱ्यांनी लिची का खाऊ नये?

Face Serum at Home : घरच्याघरी बनवा इफेक्टीव Face Serum; कमी खर्चात येईल सेलिब्रीटी सारखा ग्लो

Farmer Success Story : चवळी लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; बिलोली येथील शेतकऱ्याचे योग्य नियोजन

Gaza Airstrikes Israeli: गाझामध्ये इस्रायलचा एअर स्ट्राइक; लहान मुले, महिलांसह २० जण मृत्युमुखी, भयंकर दृश्ये

Mumbai Lok Sabha: पवईत मतदानाचा घोळ; ईव्हीएम मशिन बंद, आदेश बांदेकर भडकले

SCROLL FOR NEXT