Winter Care Ladoo Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Care Ladoo Recipe : सततच्या सर्दी-खोकल्याला करा कायमचा बाय-बाय, आयुर्वेदिक पौष्टिक लाडू खा अन् दूर पळवा, पाहा रेसिपी

How To Make Healthy And Immunity Booster Ladoo : या दिवसात इम्यूनिटी कमकुवत होते आणि सर्दी, खोकला यासांरखे आजार होतात. या ऋतूमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी आणि संधीवात यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात.

कोमल दामुद्रे

Jaggery-Dink Ladoo :

हिवाळा म्हटलं की, अनेक आजार डोकं वर काढतात. सर्दी, खोकला, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार आपल्या मागेच असतात. या दिवसात इम्यूनिटी कमकुवत होते आणि सर्दी, खोकला यासांरखे आजार होतात.

या ऋतूमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी आणि संधीवात यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. अशा वेळी आपल्याला पौष्टिक पदार्थ (Food) खाण्याचा सल्ला दिला जातो. थंडीच्या दिवसात गूळ आणि डिकांचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डिंकाचे लाडू करायला जास्त वेळही लागत नाही. रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जात्मक राहाल. पाहूया आयुर्वेदिक पौष्टिक लाडूची रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • तूप - २०० ग्रॅम

  • उडीद डाळीचे पीठ - २०० ग्रॅम

  • क्विनोआ पीठ - ५० ग्रॅम

  • ओट्स पीठ - ५० ग्रॅम

  • किसलेले सुके खोबरे (Coconut) - १ १/२ कप

  • सुंठ पावडर -२५ ग्रॅम

  • जायफळ - अर्धा चमचा

  • वेलची पूड - १ १/२ चमचा

  • काळी मिरी - १ १/२ चमचा

  • डिंक - १०० ग्रॅम

  • गूळ - ३५० ग्रॅम

2. कृती

  • कढईत मंद आचेवर तूप गरम करुन त्यात तीनही पीठ घालून १० ते १५ मिनिटे परतून घ्या. लालसर रंग येईल पर्यंत भाजून घ्या.

  • भाजून झाल्यानंतर त्यात डिंक घाला, मंद आचेवर डिंक फुगून येईपर्यंत तळा.

  • मंद आचेवर २ मिनिटे सतत ढळळत राहा ज्यांने चांगले मिसळा.

  • डिंक फुगल्यानंतर ते सतत मिसळत राहा आणि चमच्याने ढवळत राहा.

  • त्यानंतर बदामाची पूड, जायफळ, वेलची पूड, सूंठ पावडर आणि काळी मिरी पूड घाला. किसलेले खोबरे घालून एक मिनिटे चांगले मिसळा.

  • कोरडे मिश्रण पॅनमधून काढून घ्या. त्याच कढईत पुन्हा तूप घाला. गरम झाल्यावर त्यात गूळ घाला.

  • गूळ वितळेपर्यंत सतत मिसळत राहा. मिश्रण घट्ट होईल. वितळलेल्या गुळात लाडूचे मिश्रण घाला.

  • मिश्रण एकजीव करुन लाडू वळवायला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT