Interchange Fee On Online Payment : UPI सामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल, बहुतेक लोक प्रत्येक लहान आणि मोठ्या खरेदीसाठी UPI द्वारे पेमेंट करण्यास प्राधान्य देतात.
1 एप्रिल 2023 नंतर सुद्धा P2P म्हणजेच Peer to Peer व्यवहार (म्हणजे तुमच्या मित्र मंडळी, नातेवाईक यांना पैसे पाठवणे) आणि P2M म्हणजेच Peer to Merchant व्यवहार (म्हणजे UPI द्वारे दुकान इ. अस्थापनांना पैसे पाठवणे) यांना कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. थोडक्यात एका बँक (Bank) खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे UPI द्वारे पाठवित असाल, तर चार्जेस लागणार नाहीत.
फक्त जे लोक (People) Prepaid Payment Instrument (जसे की wallet, गिफ्ट कार्ड) चा वापर करतात, त्यांना चार्जेस लागू होणार आहेत. जो Merchant/ दुकानदार Wallet मध्ये पैसे स्वीकारतो, त्यालाच चार्जेस लागतील.
पण वर म्हटल्याप्रमाणे जर तोच Merchant हे पैसे थेट त्याच्या बँक खात्यात स्वीकारतो, तर त्याला चार्जेस लागत नाहीत. हे चार्जेस Merchant Category प्रमाणे 0.5 ते 1.1% आहेत.
सोबत NPCI चे प्रेस रिलीज नुसार लोकांनी टेन्शन न घेता त्या आधी संपूर्ण बातमीची जाणीवपूर्वक खात्री करून घ्यावी. लोक नेहमीच्या सवयीने खरेदीला जाताना सोबत कॅश ठेवत नाहीत.
त्यामुळे काही दुकानदार एक एप्रिल नंतर म्हणायला लागतील की, "UPI ने पैस दिले तर आम्हाला चार्जेस पडतात, म्हणून जास्तीचे 1% द्या" अशा अहवालात जाहीर केल्यानंतर जाणून घेणे गरजेचे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.