SIP Or Step-Up SIP
SIP Or Step-Up SIP Saam Tv
लाईफस्टाईल

Step-Up SIP Benefits: 10 वर्षात व्हाल मालामाल ! Step-Up SIP मध्ये करा गुंतवणूक, कशी कराल ? वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mutual Fund Investment Tips: तुम्ही सर्वांनी SIP बद्दल ऐकले असेलच. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंडातील एक पद्धतशीर गुंतवणूक योजना हा दीर्घकालीन उद्दिष्टांसह गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. म्युच्युअल फंड हा देखील एका विनिर्दिष्ट मर्यादेपेक्षा निश्चित रकमेचे योगदान देण्याचा एक सोपा मार्ग आहे. Step Up SIP म्हणजे काय आणि त्याचा फायदा जाणून घेऊया.

SIP मध्ये, गुंतवणूकदार (Investors) त्याचे पैसे (Money) थोड्या-थोड्या प्रमाणात फंडात टाकतो. इथे फंड मॅनेजर बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन तो पैसा गुंतवतो. हा पैसा शेअर्समध्ये गुंतवला जातो म्हणजे स्टॉक मार्केट, बाँड, एफडी इत्यादी इतर आर्थिक (Economic) साधनांमध्ये गुंतवले जाते. अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे वाढतात. यामुळे गुंतवणुकदाराचे जमा केलेले पैसे हळूहळू वाढू लागतात आणि दीर्घ मुदतीसाठी मोठी रक्कम तयार होते.

जर तुम्हाला नियमित SIP द्वारे 10 वर्षात 1 कोटीचा निधी तयार करायचा असेल तर तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल. कॅल्क्युलेटर नुसार, 12 वर्षांसाठी 45 हजार मासिक SIP केल्यास, 12% CAGR वर, परिपक्वतेवर रु. 1,04,55,258 चा कॉर्पस तयार होईल. यामध्ये तुमची गुंतवणूक 54,00,000 रुपये असेल आणि अंदाजे भांडवली नफा 50,55,258 रुपये असेल.

स्टेप-अप एसआयपी -

काहीवेळा जेव्हा गुंतवणूकदारांकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसे असतात, तेव्हा तज्ज्ञ त्यांना म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी रक्कम वाढवण्यास सांगतात ज्यामध्ये ते आधीच गुंतवणूक करत आहेत. येथे एक SIP Step-Up येतो, जो गुंतवणूकदारांना दरवर्षी गुंतवणूक करत असलेली रक्कम वाढविण्यास अनुमती देतो. अशा सुविधेमुळे गुंतवणूकदाराच्या कार्यकाळात जास्त रक्कम गुंतवण्याची लवचिकता वाढते. या सुविधांना SIP बूस्टर किंवा SIP Step-Up सुविधा म्हणून देखील ओळखले जाते.

सामान्य SIP अंतर्गत, गुंतवणूकदार त्यांच्या कार्यकाळात त्यांचे योगदान वाढवू शकत नाहीत. उच्च गुंतवणुकीसाठी, त्यांना नवीन योजना निवडणे आवश्यक आहे, तर Step-Up एसआयपी किंवा एसआयपी बूस्टर ग्राहकांना त्यांचे एसआयपी योगदान स्वयंचलित करण्यास आणि त्यांच्या उत्पन्नातील अपेक्षित वाढीनुसार वाढवण्याची परवानगी देतात.

जर आपल्याला Step-Up SIP वरून समजले की 1 कोटी निधी तयार करण्यासाठी किती वर्षे लागतील. कॅल्क्युलेटरनुसार, 30,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह आणि दरवर्षी 10% Step-Upसह, केवळ 10 वर्षांत 12% च्या CAGR वर 1,01,22,979 रुपयांचा निधी तयार केला जाऊ शकतो. यामध्ये तुमची गुंतवणूक 57,37,473 रुपये असेल आणि अंदाजे भांडवली नफा 43,85,506 रुपये असेल.

म्युच्युअल फंडाच्या Step-Up सुविधेची निवड करून गुंतवणूकदार चालू असलेल्या एसआयपीमध्ये त्यांचे मासिक योगदान वाढवू शकतात. उदाहरणार्थ, जर एखादा गुंतवणूकदार आधीपासून इक्विटी एमपी स्कीममध्ये 10,000 रुपये गुंतवत असेल, तर त्याला आणखी गुंतवणूक करायची आहे. तो SIP Step-Upची निवड करू शकतो आणि प्रत्येक आर्थिक/कॅलेंडर वर्ष किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा दर सहा महिन्यांनी त्याला हवी असलेली कोणतीही रक्कम जोडू शकतो.

Step-Up SIP करण्याचे फायदे -

तुमची आर्थिक उद्दिष्टे जलद गाठण्यात तुम्हाला मदत होते. या सुविधेमुळे एकाच वेळी अधिक गुंतवणूक करणे सुरू करता येते आणि अपेक्षित मुदतीपूर्वी लक्ष्य रक्कम जमा करता येते.

Step-Up एसआयपी सुविधा तुम्हाला वाढत्या महागाईशी लढण्यास मदत करते. वाढत्या महागाईमुळे पैशाचे मूल्य घसरते. या परिस्थितीतून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा एक स्मार्ट मार्ग म्हणजे महागाई दराच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक योगदान वाढवणे.

Step-Up SIP ऑटो पायलट मोडमध्ये कार्य करते, याचा अर्थ गुंतवणूकदारांना त्यांचे योगदान वाढवायचे असल्यास नवीन खाती उघडण्याच्या त्रासापासून ते वाचवते. जर तुमची योजना चांगला परतावा देत असेल, तर Step-Up SIP तुम्हाला त्याच योजनेतील SIP रक्कम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला जास्त परतावा मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

Travel Tips: कुटुंबासोबत फिरायला जाताय? अशी घ्या काळजी

Narendra Modi : निवडणुकीत बहुमत संविधान बदलण्यासाठी हवंय का? काँग्रेसच्या आरोपांना PM मोदींकडून उत्तर, म्हणाले...

Men's Ethnic Wear: पुरुषांच्या पारंपारिक पोषाखांची मागणी दिवसेंदिवस वाढतेय; शेरवाणीला मिळतेय लोकांची पसंती

Solapur Loksabha: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा; राम सातपुतेंची ताकद वाढणार?

SCROLL FOR NEXT