Solapur Loksabha: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा; राम सातपुतेंची ताकद वाढणार?

Maharashtra Loksabha Election: मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
Ramesh Kadam
Ramesh Kadam Saam Tv

सोलापूर|ता. २९ एप्रिल २०२४

मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मात्र हा पाठिंबा लोकसभेपुरता असून विधानसभा स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत. त्यांच्यासमोर महायुतीकडून राम सातपुते यांचे आव्हान असेल. निवडणुक जवळ येईल तसतशी अनेक राजकीय घडामोडी सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहेत. अशातच मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.

रविवारी सायंकाळी मोहोळमध्ये झालेल्या जाहीर सभेतून रमेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. चार दिवसापूर्वी भाजप नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने मोहोळचे राजकीय चित्र बदलणार आहे.

Ramesh Kadam
Amravati Loksabha: मतटक्क्याला झळ! अमरावती लोकसभेत ६.६७ लाख मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ

सोलापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. पूर्वनियोजित दौरा दुसरीकडे असल्याने शरद पवार मात्र आजच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 6 वाजता कर्णिकनगर येथील मैदानावर ही सभा पार पडणार आहे.

Ramesh Kadam
Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com