Why You Should Eat It Instead of Wasting It google
लाईफस्टाईल

Stale Rice Benefits: रात्रीचा शिळा भात फेकून देताय? थांबा... वाचा फायदे

Shila bhat : शिळा भात फेकू नका! त्यातील Resistant Starch पचनशक्ती सुधारतो, वजन कमी करतो आणि डायबिटीज नियंत्रित ठेवतो. योग्य पद्धतीने खाल्ल्यास शिळा भात आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

Sakshi Sunil Jadhav

  • शिळा भात पचनशक्ती सुधारतो आणि चांगले बॅक्टेरिया वाढवतो.

  • वजन कमी करण्यासाठी शिळा भात फायदेशीर ठरतो.

  • डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी शिळा भात फायदेशीर आहे.

  • शिळा भात योग्य पद्धतीने खाल्ल्यास आरोग्यासाठी सुरक्षित आहे.

भारतीय आहारात भाताचा समावेश होतो. काहींना भाताशिवाय जेवणे केल्यासारखे वाटतच नाही. जेवणाच्या थाळीत भात हा महत्वाचा मानला जातो. त्यामुळे भात हा प्रत्येक घरात शिजवला जातो. बऱ्याच वेळेस जास्त भात बनवल्याने तो उरतो. त्याला सकाळच्या नाश्त्यासाठी लोक फोडणी देऊन खातात. मात्र काहीजण भात शिळा असल्यामुळे तो लगेचच फेकून देतात. पुढे आपण शिळा भात खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो? याबद्दल जाणून घेणार आहोत.

शिळा भात फोडणी देऊन परतून खायाला प्रत्येकाला आवडतो. काहीजण नियमित नाश्त्याला फोडणीचा शिळा भात खात असतात. हा भात चवीला अतिशय टेस्टी लागतो. यावर तज्ज्ञ म्हणतात, शिळ्या भातात मोठ्या प्रमाणात Nutrients असतात. जे पचनासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पुढे आपण शिळा भात खाण्याचे फायदे जाणून घेऊ. त्यानंतर तुम्ही कधीही शिळा भात फेकून देणार नाही.

शिळा भात खाण्याचे फायदे

पचनशक्ती मजबूत करणे

शिळा भात सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते. कारण त्यामध्ये Resistant Starch असतो. याचा फायदा पचनकार्य सुधारण्यासाठी केला जातो. याने शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पोटाच्या अनेक समस्या नाहीशा होतात. गॅसच्या समस्या सुद्धा कमी होतात.

वजन कमी करणे.

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही शिळा भात खाऊ शकता. कारण शिळ्या भातात Glycemic Index खूप कमी प्रमाणात असते. त्याने रक्ताची पातळी वाढत नाही.

रक्ताची पातळी कमी होणे.

शिळ्याभातामध्ये Resistant Starch असतो. जो हळूहळू पचतो. त्यामुळे डायबिटीजची पातळी राखण्यास मदत होते. तसेच इंसुलिन sensitivity सुद्धा वाढते.

लक्षात ठेवा

१. शिळा भात फ्रिजमध्ये उघडा ठेवू नका. तो नेहमी झाकूनच ठेवा.

२. जास्त शिळा भात खाणे टाळा. अन्यथा तुम्हाला food poisoningच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

३. शिळा भात सतत गरम करु नका. एकदाच व्यवस्थित गरम करुन तुम्ही शिळा भात सेवन करु शकता. त्याने तुमच्या शरीरातली ऊर्जा सुद्धा वाढू शकते. यासगळ्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

Meenatai Thackeray Statue: हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे संतापले

Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यश

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

SCROLL FOR NEXT