Broom Cleaning Hack saam tv
लाईफस्टाईल

Broom Cleaning Hack: झाडूच्या खालच्या भागाला अ‍ॅल्युमिनियम फॉइल का गुंडाळतात? साफ-सफाईसाठी तुम्हीही वापरा ही सोपी ट्रिक!

Aluminium Foil Cleaning Hack: झाडूला अ‍ॅल्युमिनियम फॉइल गुंडाळल्याने फरशीवरील बारीक धूळ, केस आणि कचरा साफ होण्यास मदत होते का? जाणून घ्या या व्हायरल क्लीनिंग हॅकमागील स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे कारण, फॉइल गुंडाळण्याची योग्य पद्धत आणि वापरताना घ्यायची काळजी.

Surabhi Jayashree Jagdish

घराची साफसफाई करताना अनेकदा काही छोट्या गोष्टींचाही उपयोग होऊ शकतो. यासाठी घरात स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूही कामी येतात. सध्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा असाच एक क्लीनिंग हॅक चर्चेत आहे. या ट्रिकमध्ये झाडूच्या खालच्या बाजूला म्हणजेच जिथे झाडूचे केस असतात तिथे अ‍ॅल्युमिनियम फॉइल गुंडाळून झाडू वापरण्यात येतेय. यामुळे फरशीवरील बारीक धूळ, केस आणि हलका कचरा गोळा करण्यास मदत होऊ शकते, असा दावा केला जातोय.

ऐकायला ही ट्रिक थोडी वेगळी वाटू शकते. पण यामागे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थिर विद्युतचा संबंध असल्याचं म्हटलंय. फरशीवर असलेली बारीक धूळ, केस आणि कापडाचे छोटे तुकडे अनेकदा झाडू मारूनही पूर्णपणे साफ होत नाहीत. काही धूळ झाडूच्या केसांमध्ये अडकते, तर काही पुन्हा फरशीवर पसरते. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर करून हे हलके कण सहज गोळा करता येतात का, हे पाहण्याचा प्रयत्न केला.

झाडूला अ‍ॅल्युमिनियम फॉइल का गुंडाळतात?

या ट्रिकमागे मुख्य कारण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असल्याचं सांगितलं जातं. अ‍ॅल्युमिनियम हे वीज सहज वाहून नेणारे धातू आहे. त्यामुळे झाडूला अ‍ॅल्युमिनियम फॉइल गुंडाळल्यास स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होण्यावर किंवा साचण्यावर परिणाम होऊ शकतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. यामुळे धूळ आणि केस यांसारखे हलके कण गोळा करण्यास मदत होऊ शकते.

पण या ट्रिकचा परिणाम प्रत्येक झाडूवर आणि प्रत्येक प्रकारच्या फरशीवर सारखाच होईल असं नाही. खोलीतील ओलावा, फरशीचा प्रकार, झाडूची रचना आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अशा अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम अवलंबून असू शकतो. त्यामुळे याला सफाईचा खात्रीशीर उपाय न मानता घरच्या घरी करून पाहण्यासारखी एक सोपी ट्रिक समजावी.

धूळ आणि केस साफ करण्यासाठी कशी होऊ शकते मदत?

घराची साफसफाई करताना बारीक धूळ आणि केस साफ करणं अनेकदा कठीण जातं. केस झाडूच्या केसांमध्ये अडकतात. काही वेळा झाडू मारताना ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात, पण पूर्णपणे साफ होत नाहीत. हीच अडचण लक्षात घेऊन अ‍ॅल्युमिनियम फॉइलची ही ट्रिक वापरली जाते. या पद्धतीमुळे धूळ, केस आणि इतर हलके कण एकत्र गोळा करणं सोपं होऊ शकतं, असा दावा केला जातो. सिरॅमिक टाइल्स, लॅमिनेट आणि विनाइलसारख्या गुळगुळीत फरशीवर काही लोकांना याचा फायदा जाणवू शकतो.

झाडूला अ‍ॅल्युमिनियम फॉइल कसे गुंडाळावे?

ही ट्रिक करून पाहण्यासाठी कोणत्याही खास वस्तूची गरज नाही. घरातील एक सामान्य झाडू आणि अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा एक तुकडा पुरेसा आहे.

सर्वात आधी अ‍ॅल्युमिनियम फॉइलची एक शीट घ्या. आता ही फॉइल झाडूच्या खालच्या बाजूला म्हणजेच झाडूच्या केसांजवळ गुंडाळा. फॉइल व्यवस्थित बसेल याची काळजी घ्या. पण त्यामुळे झाडूचे केस हलवताना अडथळा येणार नाही, याकडे लक्ष द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे झाडू मारून फरशी साफ करा. झाडू मारल्यानंतर धूळ, केस आणि इतर हलके कण गोळा करण्यात काही फरक जाणवतो का, हे पाहा.

ही ट्रिक वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा. अ‍ॅल्युमिनियम फॉइल जास्त दुमडल्यास किंवा चुरगळल्यास त्याच्या कडा धारदार होऊ शकतात. त्यामुळे फॉइल झाडूला गुंडाळताना काळजी घ्या, जेणेकरून हाताला इजा होणार नाही.

अ‍ॅल्युमिनियम फॉइल किती दिवसांनी बदलावे?

झाडूला गुंडाळलेलं अ‍ॅल्युमिनियम फॉइल किती दिवसांनी बदलावं यासाठी कोणताही ठराविक नियम नाही. फॉइल खूप घाण झाले, फाटले किंवा जास्त दुमडून खराब झालं तर ते बदलावं. अ‍ॅल्युमिनियम फॉइल सहज उपलब्ध होतं. त्यामुळे जुनं, फाटलेलं किंवा घाण झालेलं फॉइल झाडूला लावून ठेवण्याची गरज नाही. त्याऐवजी नवीन फॉइलचा तुकडा गुंडाळून पुन्हा ही ट्रिक वापरून पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटण तालुक्यातील तारळे धरणावरील आदानी प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

Winter Workout : सकाळ, दुपार की संध्याकाळ? हिवाळ्यात व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ कोणती? शरीर राहील तंदुरुस्त

kitchen Tips : मिक्सर वापरताना या 5 चुका अजिबात करू नका, होऊ शकतो मोठा अपघात

Pune : पुण्यात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच; सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीवर महापालिकेचा हातोडा

Death News : भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ

SCROLL FOR NEXT