Women often experience emotional, physical, and hormonal changes during periods, which may increase desire — experts explain. saam tv
लाईफस्टाईल

मासिक पाळीच्या वेळी महिलांमध्ये शरीर संबंध ठेवण्याची इच्छा का वाढते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Women Desire More Intimacy During Periods: मासिक पाळीच्या काळात महिला अधिक उत्तेजित का असतात हे जाणून घेऊ. अनेक महिलांना मासिक पाळी जवळ येताच सेक्सचीची तीव्र इच्छा जाणवते. कामवासनेतील या बदलासाठी काही गोष्टी जबाबदार असतात.

Bharat Jadhav

  • मासिक पाळीत हार्मोनल बदलांमुळे सेक्सची इच्छा वाढू शकते

  • ब्लड सर्क्युलेशन आणि शारीरिक संवेदनशीलता वाढते

  • भावनिक जवळीक आणि आरामाची गरज वाढते

मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक बदल जाणवत असतात. यात सेक्सची इच्छा वाढणे देखील समाविष्ट आहे. काही महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक संवेदनशील आणि भावनिक वाटत असते. तर काही महिलांना त्यांच्या कामवासनेत वाढ झाल्याचा अनुभव येत असतो. बहुतेक महिला याबद्दल खूप गोंधळलेल्या राहतात.

या महिलांना वाटते की मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे आरोग्यासाठी चांगले नसते. खरं तर, त्या काळात जवळीक साधण्याची किंवा शरीर संबंध प्रस्थापित इच्छा असणे अगदी सामान्य आहे. हार्मोन आणि पीसीओएस तज्ज्ञ चेतन अरोरा यांनी महिलांमध्ये जास्त सेक्सची इच्छा का असते याची चार कारणे स्पष्ट करणारा एक व्हिडिओ शेअर केलाय.

हार्मोनल चढउतार

स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या वेळेपासून इंटीमेसी भावना वाढते. खरं तर, जसजशी त्यांची मासिक पाळी जवळ येते, महिलांमधील हार्मोनल बदलत असतात. यामुळे कामवासना वाढते. इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनमधील चढ-उतारांमुळे शरीर अधिक संवेदनशील होत असते.

मासिक पाळीच्या त्रासापासून आराम

अनेक महिलांना असे वाटते की मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याने त्यांच्या मासिक पाळीशी संबंधित अस्वस्थता आणि वेदनांपासून आराम मिळतो. मासिक पाळीच्या दरम्यान पेल्विक भागात रक्त प्रवाह वाढतो. तसेच, मासिक पाळीपूर्वी योनीतून स्त्राव झाल्यामुळे, योनीच्या भागात संवेदनशीलता वाढते, स्नेहन ल्यूब्रिकेशन होते आणि वेदना कमी होतात.

यामुळे योनीमार्ग अधिक संवेदनशील वाटत असतो आणि महिलांमध्ये जवळीकतेची इच्छा वाढत असते.मासिक पाळीच्या वेळी अनेक महिलांना त्यांच्या शरीराशी अधिक कनेक्टेड वाटते. यामुळे त्यांची कामवासना वाढते आणि त्यांना अधिक लैंगिक उत्तेजना जाणवत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT