Shravan Special Canva
लाईफस्टाईल

Shravan Special : श्रावणात मासे का खात नाहीत? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

Avoid Fish during Shravan : श्रावण महिन्यात मांसाहाराचे सेवन करणं टाळा असे शास्त्रमध्ये सांगीतले आहे. परंतु, श्रावणात मासे का खाऊ नये यामागे काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिन्यात सामिष खाउ नये असे शास्त्रात म्हंटले आहे. परंतु त्याला काही शास्त्रीय आधार आहेत का, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केल्यावर जी कारणे समोर आली ती मांडायचा प्रयत्न या लेखातून केलाय. खरेतर, कोणल्याही प्रकारचा मांसाहार या काळात करू नये असे सागितले जाते, परंतु मासे का खाउ नयेत याबाबत शास्त्रीय आधार आपल्याला मिळतो.

पहिले कारण म्हणजे पावसाळ्याचा कालावधी हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. त्या काळात लाखो अंडी माशांच्या पोटात असतात. अशावेळी त्यांची शिकार केल्याने अनेक मासे जन्मण्यापुर्वीच मरून जातात. हे सुरूच राहील्यास काही माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर जातील.

दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे श्रावण महिना जुलै - ऑगस्टच्या आसपास येत असल्याने पावसाचा जोर या कालावधीत जास्त असतो. वारेही मोठ्या प्रमाणात वेगाने वहात असतात. समुद्राला उधाण येतं. समुद्री वादळे या कालावधीत जास्त असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यात धोका असतो. समुद्रात झंझावात उठले की, मासेमार्यांची धावपळ उडते. हेही एक महत्वाचे कारण या कालावधीत माशांची मागणी कमी व्हावी यासाठी असावे. मागणी कमी झाल्यास सहाजिकच त्याचा परिणाम पुरवठ्यावर होतो. खाणारांनी मासे खरेदी केलेच नाहीत तर मासेमार समुद्रात जाणारच नाहीत.

तिसरे कारण आहारशास्त्रानुसार सांगता येते. पावसाळ्याचा काळ प्रदोषयुक्त असल्याने या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. मांसाहार काही प्रमाणात पचावयास जड असल्याने मासे खाउ नये असे सांगितले आहे. मान्सूनच्या पावसामुळे अनेकदा जलप्रदूषण वाढते. कारण पावसाचे पाणी जमिनीतील प्रदूषकांना नद्या, तलाव आणि समुद्रांमध्ये मिसळून टाकते. मासे आणि इतर समुद्री प्रजाती हे प्रदूषक ग्रहण करू शकतात, जे त्यांच्या शरीरात जमा होऊ शकतात. जेव्हा मानव दूषित मासे खातात, तेव्हा ते जड धातू आणि रसायने यासारख्या हानिकारक पदार्थांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

SCROLL FOR NEXT